वंचित लोकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

By admin | Published: June 14, 2014 08:58 PM2014-06-14T20:58:18+5:302014-06-14T23:40:23+5:30

तहसील कार्यालयाला बंजारा क्रांती दलाच्या वतीने ताला ठोको आंदोलन करण्याचा ईशारा बंजारा क्रांतीदलाने दिल्यानंतर वंचित लोकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला.

Order to survey the loss of the disadvantaged people | वंचित लोकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

वंचित लोकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

Next

मानोरा : गारपीट, भिंतींची पडझड व अतवृष्टीचा लाभ देऊन बाधित शेतकर्‍यांना आठ दिवसात कर्ज पुनर्गठनाचा लाभ न दिल्यास तहसील कार्यालयाला बंजारा क्रांती दलाच्या वतीने ताला ठोको आंदोलन करण्याचा ईशारा बंजारा क्रांतीदलाने दिल्यानंतर नायब तहसीलदार महल्ले यांनी वंचित लोकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश मंडळ अधिकार्‍यांना १२ जून रोजी दिला.

येथील तहसील कार्यालयात १२ जून रोजी दुपारी ४ वाजता मानोरा तालुक्यातील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक सह सर्व पुरस्कृत बँक शाखा व्यवस्थापकाची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून आंदोलनकर्ते बंजारा क्रांती दल जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, देवराज राठोड, डॉ.श्याम गव्हाणे, शिवसेना उपतालुका प्रमुख ठाकूरसिंग चव्हाण, शहर प्रमुख मनोहर राठोडसह यांची उपस्थिती होती. यावेळी आंदोलकांनी सुरूवातीला अतवृष्टी गारपीट व पडझड या विषयावर चर्चा करून पुनर्गठण म्हणजे काय त्याचे निकष कोणते याची भूमिका विषद करण्याची मागणी लावून धरली.परंतु, ज्या शेतकर्‍यांनी रब्बी पीककर्ज घेतले आहे अशाच गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना पुनर्गठनाचा लाभ देण्यात यावे असे आदेश असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगताच सांगताच बंजारा क्रांतीदलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन आठ दिवसात गारपीट, भिंतींची पडझड व अतवृष्टीचा लाभ देऊन बाधित शेतकर्‍यांना कर्ज पुनर्गठनाचा लाभ न दिल्यास तहसील कार्यालयाला बंजारा क्रांती दलाच्या वतीने ताला ठोको आंदोलन करण्याचा ईशारा सुनील जाधव, डॉ.श्याम गव्हाणे, देवराज राठोड यांनी दिला.यावेळी मंडळ अधिकार्‍यांना त्वरित वंचित लोकांचा सर्वे करण्याचा आदेश नायब तहसीलदार महल्ले यांनी दिले.

Web Title: Order to survey the loss of the disadvantaged people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.