‘मनरेगा’तून होणार पांगरी महादेवचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:20 AM2021-02-05T09:20:58+5:302021-02-05T09:20:58+5:30

जल हक्क कार्यकर्ता सचिन कुळकुर्णी यांच्या पुढाकाराने हिंगे यांनी पांगरी गावाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जोपर्यंत गावाला ...

Pangri Mahadev will be developed through MGNREGA | ‘मनरेगा’तून होणार पांगरी महादेवचा विकास

‘मनरेगा’तून होणार पांगरी महादेवचा विकास

googlenewsNext

जल हक्क कार्यकर्ता सचिन कुळकुर्णी यांच्या पुढाकाराने हिंगे यांनी पांगरी गावाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जोपर्यंत गावाला ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायतीशी जोडले जात नाही, तोपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचविणे अवघड आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित प्रयत्न केले जातील. गावाच्या सभोवताल सिमेंट बांध, शेततळे उभारून नाला खोलीकरण केल्यास पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यादृष्टीने मनरेगातून ही कामे प्रस्तावित केली जातील, असे हिंगे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन वनग्राम समितीचे विष्णू मंजुळकर यांनी केले होते. यावेळी नांदखेडा येथील डॉ. प्रतापराव जायभाये, मंडळ अधिकारी दिलीप चौधरी, शेंदूरजना मोरे गावचे तंटामुक्त गावसमिती अध्यक्ष मोतीराम लकडे यांच्यासह गावातील नागरिक, महिलांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Pangri Mahadev will be developed through MGNREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.