शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 03:12 PM2019-05-03T15:12:20+5:302019-05-03T15:14:48+5:30
वाशिम : जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अकोला -हिगोली या राष्ट्रीय महामार्गासाठी ३२ गावांतील ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमिन संपादित करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अकोला -हिगोली या राष्ट्रीय महामार्गासाठी ३२ गावांतील ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमिन संपादित करण्यात आली. तथापि, सहा महिन्यांत केवळ २०१ शेतकऱ्यां ना मोबदला देण्यात आला होता. या संदर्भात लोकमतने २४ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने दखल घेत मोबदला देण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. आजवर जवळपास ३४६ कोटीपैकी ९६ कोटींपेक्षा अधिक रकमेचे चुकारे अदा करण्यात आले असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वाशिम जिल्ह्यातून जाणाºया पाच प्रमुख मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यात आला. या महामार्गांची कामे करण्यासाठी काही शेतकºयांची जमीन संपादित करणे आवश्यक होते. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातून जात असलेल्या वाशिम-हिंगोली या एन.एच. १६१ क्रमांकाच्या महामार्गासाठी वाशिम आणि मालेगाव तालुक्यातील ३२ गावच्या शेतकºयांची मिळून २३७ हेक्टर जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने यासंदर्भातील प्रक्रिया पार पाडण्यात आल्यानंतर उपविभागीय अधिकारी स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करून ३२ गावातील शेतकºयांची १५५ हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन संपादित करण्यात आली. शासनाने ठरविलेल्या दरानुसार शेतकºयांना मोबदला अदा करण्याचे निश्चित झाले आणि शेतकºयांना त्याबाबत माहितीही देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात केवळ २०७ शेतकºयांनाच बँकांमधून धनादेशांव्दारे मोबदल्याच्या रकमेचे वितरण करण्यात आले. निवडणुकीची आचारसंहिता आणि इतर तांत्रिक कारणांमुळेही यात खोळंबा निर्माण झाला होता. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर शेतकºयांना चुकारे अदा करण्यासाठी आवश्यक प्रक्रियेला उपविभागीय अधिकारी कार्यालयाने वेग दिला असून, आजवर ९६ कोटींपेक्षा अधिक रकमेचे चुकारे शेतकºयांना अदा करण्यात आले.
४१६ शेतकऱ्यांसाठी नोटीस तयार
एनएच १६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ज्या शेतकºयांची जमी आजवर संपादित करण्यात आली. त्यापैकी २०७ शेतकºयांना मोबदला मिळाल्यानंतर आता १३ गावांतील ४१६ शेतकºयांना मोबदल्यासाठी कागदपत्रे सादर करण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आल्या आहेत. या नोटीसनंतर संबंधित शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर केल्यानंतर त्याची तपासणी करून शेतकºयांचे धनादेश बँकेकडे सादर करण्यात येणार आहेत.
महामार्गासाठी ज्या शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकरणातील आक्षेप व हरकतींचे निवाडे झाल्यानंतर मोबदला अदा करण्यात येत आहे. आजवर ९६ कोटींचे वाटप केले असून, ४१६ शेतकºयांना कागदपत्रे सादर करण्याच्या सुचना देण्यासाठी नोटीस तयार करण्यात आल्या आहेत.
-प्रकाश राऊत
उपविभागीय अधिकारी
वाशिम