.................
पेट्रोल डिझेलचे दर (प्रति लिटर)
२०१७ - ७५, ५८
२०१८ - ८६, ७८
२०१९ - ८०, ६९
२०२० - ८६, ७८
२०२१ - ९०, ८१
.........................
कोट :
पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. संघटनेच्या माध्यमातून आंदोलन उभारून तो लवकरच समोर आणण्याचा प्रयत्न राहील.
- राजू वानखेडे
शेतकरी संघर्ष संघटना
..................
विद्यमान शासनाने पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर आटोक्यात आणण्यासाठी कुठलेच प्रयत्न केलेले नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. या प्रश्नावर लवकरच आंदोलन उभारू
- मनीष डांगे
छावा संघटना
......................
गेल्या पाच वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांसोबतच खाद्यतेलांच्या दरांमध्येही वाढच होत आहे. हा प्रश्न अत्यंत गंभीर असून राज्यकर्त्यांना त्याचे काहीच देणेघेणे उरले नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
- महेश धोंगडे
मोरया ब्लड ग्रुप डोनर संघटना
......................
गेल्या काही वर्षांत ऑटोंची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामुळे प्रवासी मिळणे अशक्य झाले. अशातच डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जगणे कठीण झाले आहे.
- राहुल इंगोले
ऑटोचालक
.......................
मालवाहू वाहनाव्दारे दिवसभर राबराब राबून शे-पाचशे रुपये मिळत होते. आता मात्र डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जास्तीत जास्त पैसे खर्च होऊन मिळकत मात्र अत्यल्प प्रमाणात मिळत आहे.
- ज्ञानेश्वर जारे
.............................
दर वाढल्याने बाजारपेठेवर परिणाम
१) पेट्रोल व डिझेलच्या दरात सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असून ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोचालक, मालवाहू वाहनधारक आणि कृषीमालाची ने-आण करणारे वाहनचालक अडचणीत सापडले आहेत.
..............
२) सध्या तूर कापणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकरी शहराच्या ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी आणत आहेत; मात्र डिझेलचे दर वाढल्याने वाहनमालकांकडून अधिकचे पैसे मागितले जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.