'पिरीपा'चे वाशीम जिल्हा कचेरीवर 'जबाब दो' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 05:12 PM2018-07-04T17:12:16+5:302018-07-04T17:13:58+5:30

पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्या मार्गदर्शनात बुधवार, ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  जबाब दो आंदोलन करण्यात आले.

'Piripa' movement at Washim collector office | 'पिरीपा'चे वाशीम जिल्हा कचेरीवर 'जबाब दो' आंदोलन

'पिरीपा'चे वाशीम जिल्हा कचेरीवर 'जबाब दो' आंदोलन

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर ४ जुलै रोजी जबाब दो आंदोलन करुन अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. शेकडो पदाधिकारी, कार्यकतै सहभागी होते.

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम - शिरपुटी येथील दलितांवर झालेल्या अन्याय प्रकरणी आरोपींना अटक करणेसह भीमा कोरेगाव प्रकरणातील आरेापींना पकडण्यास सरकार दिरंगाई करत असल्याचा निषेध यासह इतर अनेक मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या वतीने लाँगमार्च प्रणेते, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य व पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्या मार्गदर्शनात बुधवार, ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  जबाब दो आंदोलन करण्यात आले.
  शिरपुटी येथील दलित समाजातील लोकांवर झालेला अन्याय, भिमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना अटक करा, शेतकर्‍यांवरील कर्जाचा बोझा, कर्जबाजारी शेतकर्‍यांचे बळी, विविध आर्थिक महामंडळाची कर्जमाफी, जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ व पेट्रोल डिझेलची वाढती दरवाढ, भूमिहीन अतिक्रमण धारकांना ई क्लास जमिनीचे मालकी पट्टे मिळावे, मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीत वाढ करुन नियमितता आणावी, सुशिक्ष्ीात बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे, वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी, बौध्दांवरील वाढत्या अत्याचारास प्रतिबंध घालावा, मागासवर्गीयांवरील पदोन्नतीवरील आरक्षण बंद का करण्यात आले आदी सर्व प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी  राज्य विधी मंडळाच्या ४ जुलै रोजी नागपूर येथे सुरु होणार्‍या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण राज्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, यांच्या मार्गदर्शनात तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा नेते जयदीप कवाडे यांच्या निर्देशानुसार  व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर ४ जुलै रोजी जबाब दो आंदोलन करुन अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, जिल्हा महासचिव सरकार इंगोले, जग्गु राऊत, महिला जिल्हाध्यक्षा वंदना राऊत, अनिल कांबळे, रवि भगत, गजानन केसवाणी, राष्ट्रपाल हिवराळे, महेश परवरे, सागर सहारे,  गणेश उफाडे, संतोष इंगळे, पांडुरंग पाटील अंभोरे, संघपाल घुगे, पंडीतराव खडसे, ग.ना. कांबळे, पप्पू कांबळे, महादेव कांबळे, विजय पट्टेबहादूर, राज बलखंडे, प्रवीण पट्टेबहादूर, रत्नमाला कांबळे, महेंद्र कांबळे, सुधाकर इंगळे, अशोक वानखेडे, संतोष वाघमारे, सुरेश हिवराळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकतै सहभागी होते.

Web Title: 'Piripa' movement at Washim collector office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.