जागतिक पर्यावरण दिनी चिमुकल्यांनी केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 05:48 PM2018-06-05T17:48:05+5:302018-06-05T17:48:05+5:30
वाशिम: जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर कारंजा तालुक्यातील बेलमंडळ ग्रामपंचायने वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. या उपक्रमात गावातील चिमुकल्यांनी सहभागी होऊ न वृक्षारोपण करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. वृ
वाशिम: जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर कारंजा तालुक्यातील बेलमंडळ ग्रामपंचायने वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. या उपक्रमात गावातील चिमुकल्यांनी सहभागी होऊ न वृक्षारोपण करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. वृद्ध मंडळीनीही वृक्षारोपण केले.
यंदाच्या जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या बेलमंडळ येथे गावकºयांनी श्रमदानातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. या अंतर्गत स्पर्धेच्या नियमांत समाविष्ट असलेल्या रोपवाटिकेचाही समावेश आहे. जागतिक पर्यावरण दिनी या कामांची पाणी पाणी फाऊंडेशनच्या टीमने केली. सामाजिक प्रशिक्षक दिक्षा शेवाळे यांचा समावेश होता. त्यांनी कामाची पाहणी करून आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायतने वृक्षारोपण उपक्रमही राबविला. या उपक्रमांत गावातील चिमुकल्यांनी सहभाग नोंदवित विविध वृक्षांची लागवड केली आणि लागवड केलेले सर्व वृक्ष जगविण्याचा मानसही व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह महिला, पुरुषांनीही विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी सरपंच सचिन एकनार, ग्रामपंचायत सदस्य, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक श्याम सवाई, रविंद्र लोखंडे, तांत्रिक प्रशिक्षक रविंद्र ढाले, किरण रहाणे व गावकरी उपस्थित होते.