- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत बॅंक खात्यावर जमा झालेले मात्र यातील अपात्र, मयत, चुकीने लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यात ऑनलाईन नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी खोटी माहिती भरलेल्या तसेच करपात्र असलेले शेतकरी मिळून ४ हजार ९९६ शेतकऱ्यांकडून ३ कोटी ८३ लाख १० हजार रुपयांच्या रकमेची वसुली करण्यात येणार असून, ही प्रक्रिया सुरू आहे. आजवर अपात्र शेतकऱ्यांकडून ८० हजार रुपयांची वसुली झाली आहे.
जिल्ह्यातील २९६७ करदाते शेतकरी?गेल्यावर्षी जिल्ह्यात करपात्र असतानाही पीएम किसान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २ हजार ९६७ आहे. या शेतकऱ्यांकडून २ कोटी ८२ लाख ५६ हजार रुपयांच्या रकमेची वसुली प्रशासनाकडून केली जात आहे.
शासनाच्या निर्देशानुसार पीएम किसानमधील अपात्र आणि कर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या लाभाच्या रकमेची वसूली केली जात आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करून तातडीने ही रक्कम परत करावी. - एस. षण्मुगराजन, जिल्हाधिकारी