वाशिम शहराला एकबुर्जी प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येताे. एकबुर्जी हेडवक्स व जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे शहरातील नळधारकांना वेळेवर पाणी मिळत नाही आहे. यासंदर्भात नगर परिषद पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता एकबुर्जी जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत तार तुटल्यामुळे ही समस्या उद्भवली असल्याचे सांगण्यात आले. नगर परिषद प्रशासनातर्फे ताबडताेब दुरुस्ती करुन नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचे नियाेजन करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या वादळ, वारा व पावसामुळे जल विद्युत तार तुटल्यामुळे शहरातील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तसेच शहरातील विविध भागात हाेणारा पाणी पुरवठा पुढील दाेन दिवसही उशिराने हाेणार असल्याचे संकेत आहेत. याबाबत नगर परिषद पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता पंकज साेनुने यांच्याशी संपर्क साधला असता टेक्निकल अडचण आलेली असून ते दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले.
................
दाेन दिवस उशिराने पाणी पुरवठा
वाशिम शहरासह परिसरात गत तीन दिवसांपासून वादळ, वाऱ्यासह पाऊस बरसला. यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रानजिक खांबावरीलही तार तुटल्याने जलशुध्दीकरण येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पाणी पुरवठा प्रभावित झाला असून येत्या दाेन दिवसात उशिरा पाणी पुरवठा केल्या जाणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने कळविले.
..............
एकबुर्जी हेडवक्स व जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. विद्युत खांबावरील तार तुटले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. शहरातील विविध भागात हाेणारा पाणी पुरवठा पुढील दाेन दिवस उशिराने हाेईल याची नळधारकांनी नाेंद घ्यावी.
- दीपक माेरे, मुख्याधिकारी, नगर परिषद वाशिम