एकाच फिडरवरून २१ गावांना वीजपुरवठा

By admin | Published: June 15, 2014 01:13 AM2014-06-15T01:13:15+5:302014-06-15T01:13:53+5:30

साखरडोहसह येथून विद्युत पुरवठा होणार्‍या २१ गावांना दररोज आपली रात्र अंधारात काढावी लागत आहे.

Power supply to 21 villages from single feeder | एकाच फिडरवरून २१ गावांना वीजपुरवठा

एकाच फिडरवरून २१ गावांना वीजपुरवठा

Next

साखरडोह : मानोरा तालुका वीज वितरण कंपनी अंतर्गत साखरडोह येथील ३३ केव्ही विद्यूत उपकेंद्रात महावितरणच्या अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे साखरडोहसह येथून विद्युत पुरवठा होणार्‍या २१ गावांना दररोज आपली रात्र अंधारात काढावी लागत आहे. येथील३३ केव्ही विद्यूत उपकेंद्रातील तांत्रिक अडचणीमुळे गावठाण फिडर, कृषीपंप फिडर वशेंदूरजना फिडरमधून विद्यूत पुरवठा होतो. परंतु त्यामधील साखरडोह फिडर व कृषीपंप फिडर हे दोन फिडर गेल्या तीन महिन्यापाून तांत्रिक अडचणीमुळे बिघडलेले आहेत. त्यामुळे या दोन बिघाड झालेल्या फिडरचा भार व्यवस्थित असलेल्या एका फिडरवर टाकण्यात आला आहे.त्यामुळे विजेचा लोड वाढून वीजपुरवठा खंडित होणे किंवा वारा आला की तारा तुटणे, विद्यूत पुरवठा दर १0 ते १५ मिनिटाला खंडित होणे, लाईन ट्रिप न होणे, स्पार्किंग होणे अशा अनेक समस्याला ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यातच ३३ केव्ही विद्यूत उपकेंद्रातील महत्वाची मशिन असलेल्या पावर ट्रान्सफार्मरमधून गेल्या दोन-तीन महिन्यापासून ऑईलची गळती होत आहे. त्यासाठी येथील यंत्रचालकांनी वारंवार वरिष्ठांशी तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्यांनी याकडे लक्ष दिले जात नाही. परिणामी पावसाळा सुरू होताना सुटणार्‍या वार्‍यामुळे तारा तुटणे, झाड पडणे, स्पार्किंग होणे, वीजपुरवठा खंडित होणे .त्यामुळे ग्राहक परेशान झाले आहेत. उपकेंद्रातील रात्रीच्या वेळी काही बिघाड झाल्यास २१ गावांना विद्यूत पुरवठा करणार्‍या उपकेंद्रात कायमस्वरूपी लाईनमन नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते.व्हीसीबी मशिन खराब असून त्या दुरूस्त करण्याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे. गावामध्ये विद्युत पुरवठा करणार्‍या डीपीला फ्यूज नाहीत. त्याकडे लक्ष नाही. ग्राहकांना महिना न भरताच बिल देणार्‍या महावितरणचे मात्र ग्राहकांना वीज देण्याकडे लक्ष नाही. एखाद्या अभियंत्याला विचारणा केली तर आम्ही वरिष्ठांना सांगितले आहे. एक-दोन दिवसात होणार, कर्मचारी पाठविले अशी उत्तरे देतात. प्रत्यक्षात मात्र काहीही नाही, त्यातच साखरडोह उपकेंद्रातील यंत्रचालकांनी विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होणे त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागतो. म्हणून जोपर्यंत ही कामे व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. साखरडोह गावठाण फिडर व्यवस्थित न केल्यास, पावर ट्रान्सफार्मरमधून जाणारे ऑईलचे काम न केल्यास, डीपीमध्ये फ्यूज बॉक्स व वाढीव डीपी न दिल्यास नागरिक आपण आता मानोरा येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊ अशी चर्चा करू लागले आहेत.

Web Title: Power supply to 21 villages from single feeder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.