लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत शेतकºयांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले असून, आता पुढच्या हंगामासाठी सोयाबीनच्या बियाणे प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी बियाण्यांचे नमुने संकलित करून उगवण क्षमता तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत.वाशिम जिल्ह्यात यंदा ३६७३ शेतकºयांनी महाबिजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत सोयाबीनचे उत्पादन घेतले. या शेतकºयांकडून महाबीजने २ लाख १ हजार क्विंटल सोयाबीनही खरेदी केले. आता या सोयाबीनमधून दर्जेदार बियाणे निवडण्यासाठी ग्रेडिंग प्रक्रियेला महाबीजच्या बिज प्रक्रिया केंद्रात सुरूवात करण्यात आली. महाबीजच्या बीज प्रमाणिकरण अधिकाºयांच्या देखरेखीत निकृष्ट दाणे आणि काडीकचरा वेगळा करून ठसदार व उत्कृष्ट दर्जाचे सोयाबीन प्रत्येकी ३० किलोच्या बॅगमध्ये भरण्यात येत असून, ही प्रक्रिया पार पाडतानाच बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी प्रत्येक बॅगमधून ५० ग्रॅम नमुना घेण्यात येत आहे. या नमुण्यांची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत झाल्यानंतर बियाणे विक्रीस काढण्याबाबतचे आदेश महाबीजच्या स्थानिक अधिकाºयांना देण्यात येतील. नमुण्यांच्या तपासणीत बियाण्यांची उगवण क्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आढळून आली, तरच बियाणे विक्रीस काढण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यापेक्षा कमी उगवण क्षमता असलेल्या शेतकºयांचे बियाणे परत केले जाईल किंवा शेतकºयाची इच्छा नसल्यास सदर बियाणे निविदा काढून विक्री करण्यात येईल. यानंतर आलेल्या रकमेतून शेतकºयांना मोबदला देण्यात येणार आहे.
पुढच्या हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 5:36 PM