वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:48 PM2018-04-04T13:48:33+5:302018-04-04T13:48:33+5:30
मालेगाव : प्राथमिक शिक्षकांना त्यांचे माहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे हे वेतन वेतन किमान १४ एप्रिल पूर्वी करण्याची मागणी साने गुरुजी सेवा संघाचे मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन सोनोने यांनी केली आहे.
मालेगाव : प्राथमिक शिक्षकांना त्यांचे माहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे हे वेतन वेतन किमान १४ एप्रिल पूर्वी करण्याची मागणी साने गुरुजी सेवा संघाचे मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन सोनोने यांनी केली आहे.
शासनाच्या शालार्थ आॅनलाइन वेतन प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये १२ जानेवारी २०१८ पासून तांत्रिक दोष निर्माण झाला होता म्हणून, प्राथमिक शिक्षकांचे जानेवारीचे वेतन आॅफलाइन पद्धतीने करण्याबाबत २ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली होती. त्यानंतर फेब्रुवारी न्तर फेब्रुवरी ते एप्रिल २०१८ पर्यन्त चे वेतन आॅफलाइन पद्धतीने काढ़न्यसाठी 23 फेब्रुवरी च्या आदेशानुसार सांगण्यात आले होते. नंतर मार्च एन्ड च्या नावा खाली अजूनही वेतन दिले गेले नाही. महिन्याच्या १ तारखेला वेतन देण्यासाठी शासनाचा नियम आहे. परंतु मासिक वेतन आॅनलाइन असो की आॅफलाइन ते १ तारखेला च मिळाले पाहिजे; परंतु असे होत नसल्याने अनेक शिक्षकांची कर्जाचे हप्ते थकित राहत आहेत, तसेच या कर्जावर विनाकरण व्याज लागते. यामुळे अनेक शिक्षकाना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांचे वेतन लवकरात लवकर करावे. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी असल्याने हा सोहळा आनंदात साजरा करता यावा म्हणून, १४ एप्रिलपूर्वीच शिक्षकांचे वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी समस्त शिक्षक वर्गाकडून करण्यात आली आहे.
शासनाच्या नियमानुसार शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच अदा करणे अपेक्षित आहेत; परंतु असे होत नाही. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक फटका बसतो आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षकांचे वेतन नियमित महिन्याच्या पहिल्याच तारखेला द्यावे आणि फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन १४ एप्रिलपूर्वी करावे.
- गजानन सोनोने, तालुका अध्यक्ष, साने गुरुजी शिक्षक संघ मालेगाव