प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन : लाभार्थींची संकलित माहिती संकेतस्थळावर अपलोड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:32 PM2018-05-16T14:32:56+5:302018-05-16T14:32:56+5:30
वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत लाभार्थी कुटुंबाची संकलित केलेली माहिती शासनाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली जात आहे. यासाठी २१ मे अशी अंतिम मुदत देण्यात आली.
वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत लाभार्थी कुटुंबाची संकलित केलेली माहिती शासनाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली जात आहे. यासाठी २१ मे अशी अंतिम मुदत देण्यात आली.
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ योजने अंतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबाला प्रतिवर्षी ५ लाख रुपये आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. देशभरात कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात विनामूल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत गावपातळीवर ग्रामसेवक, एएनएम आणि आशा आदींच्या माध्यमातून पात्र लाभार्थींची माहिती संकलीत करण्यात आली. ३० एप्रिल रोजी ग्रामसभेमध्ये याद्यांचे वाचनही झाले. यावेळी अनुपस्थित असलेल्या लाभार्थी कुटुंबांची माहिती आशा, आरोग्य सेविकेव्दारे गृहभेटी देवून १ मे ते १० मे २०१८ या कालावधीत संकलित करण्यात आली. त्यानंतर संकलीत केलेली माहिती शासनाच्या संकेतस्थळावर २१ मे पर्यंत ‘अपलोड’ करण्याची अंतिम मुदत आहे. याशिवाय लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहितीदेखील संकलित केली जात आहे. गोरगरीब लाभार्थीला विनामूल्य वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून सदर योजना अंमलात आली असून, वाशिम जिल्ह्यातील कुणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी गृहभेटीद्वारे माहितीचे संकलन करण्यात आले. याव्यतिरिक्त २१ मे पर्यंत अतिरिक्त माहिती घेतली जाणार आहे. पात्र लाभार्थींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.