योग्य नियोजनातूनच समृद्धीकडे जाणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:55+5:302021-01-08T06:11:55+5:30

समृद्ध गाव स्पर्धेत समावेश असलेल्या जांब येथे शेतकरी व बचतगटातील महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत ...

Prosperity can only be achieved through proper planning | योग्य नियोजनातूनच समृद्धीकडे जाणे शक्य

योग्य नियोजनातूनच समृद्धीकडे जाणे शक्य

Next

समृद्ध गाव स्पर्धेत समावेश असलेल्या जांब येथे शेतकरी व बचतगटातील महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत जलव्यवस्थापन, मृद व जलसंधारण, गावकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पौष्टिक गवताचे कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य सुधारणे, वृक्ष व जंगलाची वाढ करणे अशा सहा स्तंभांवर काम केले जाणार आहे. याबाबत माहिती देताना तोटावार यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी मूल्यांकनाचा आधार घेत शासनाच्या विविध योजनांचे बारकाईने नियोजन करावे. कृषी विभाग तसेच शासनाच्या इतर योजनांचा फायदा घेऊन शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट पालन, गांडूळ खतनिर्मिती व पारंपरिक पिकांला फाटा देऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. या माध्यमातून शेतातील उत्पन्न वाढविण्याकरिता प्रयत्न करायला हवे. या सर्व कामांचे योग्य नियोजन केले तरच यश मिळणे शक्य आहे, असे तोटावार म्हणाले. कार्यक्रमास कृषी विभागाचे तंत्र अधिकारी कंकाळ, तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले, विभागीय समन्वयक सुभाष नानवटे, सरपंच साहेबराव भगत, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्यासह गावातील बहुसंख्य शेतकरी, महिलांची उपस्थिती होती.

Web Title: Prosperity can only be achieved through proper planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.