वाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गाशी लढा देणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षक किट पुरविण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने निधीची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाºयांना आरोग्य किट पुरविण्यात आली असून, दुसºया टप्प्यात उर्वरित कर्मचाºयांना ही किट दिली जाणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असून, आरोग्य यंत्रणा कर्तव्य बजावत रुग्णसेवा देत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अधिकारी, कर्मचाºयांना ट्रिपल लेअर व एन ९५ मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर आदी प्राथमिक स्वरुपातील संरक्षक किट पुरविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, राज्याच्या आरोग्य विभागाच्या विविध योजनातील निधी तसेच जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधीची तरतूद करण्यात आली असून, सदर साहित्य कर्मचाºयांना उपलब्ध करून देण्यात आले. उच्च दर्जाचे ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट’ (पीपीटी/संरक्षक कीट) साहित्याचा तुटवडा असल्याने सदर साहित्य सर्व कर्मचारी व अधिकाºयांसाठी उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. पहिल्या टप्प्यात ६० टक्के कर्मचाºयांना पीपीटी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये हॅण्डग्लोज, मास्क, गाऊन, हेल्मेट, डोळे संरक्षक चष्मा इत्यादींचा समावेश असतो. अमरावती विभागातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाºयांना सदर साहित्य पुरविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्याचा विचार करता आतापर्यंत १५ हजार ट्रिपल लेअर मास्क व तीन हजार एन ९५ मास्क तसेच ५०० पीपीटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दुसºया टप्प्यात तेवढ्याच प्रमाणात सदर साहित्य उपलब्ध करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षक किट पुरविण्यासाठी निधीची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 3:55 PM