मालेगावात पर्यावरणपुरक रंगपंचमीसंदर्भात जनजागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:53 PM2018-03-01T14:53:34+5:302018-03-01T14:53:34+5:30
मालेगाव - रंगपंचमीच्या दिवशी अर्थात २ मार्च रोजी रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपुरक नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून रंगपंचमी होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक बालविकास प्राथमिक शाळेत २८ फेब्रुवारी रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

श्री व्यंकटेश सेवा समिती वाशिमद्वारा संचालिक बालविकास मंदिर शाळेत आयोजित कार्यक्रमात नैसर्गिक रंग निर्मितीविषयी ज्येष्ठ शिक्षक भुसारी व मुख्याध्यापक भिसडे यांनी मार्गदर्शन केले. पूर्वीच्या तुलनेत आता रासायनिक रंगांचा वापर वाढल्याने नागरिकांना आपले आरोग्य जपावे लागणार आहे. रंगांची उधळण करताना सतर्कता बाळगावी, असा सल्ला शिक्षकांनी दिला. रासायनिक रंगांमुळे विविध प्रकारचे त्वचारोग उद्भवू शकतात. शक्यतोवर रासायनिक रंग खेळण्यापेक्षा नैसर्गिक रंगांचा वापर करा, असे आवाहन केले. पळसाच्या फुलांपासून, मुलतानी माती, हळद, मैदा, कुंकु तसेच झाडांच्या हिरवा पाला आदींपासून विविध रंग कसे तयार करावे, याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. रंगपंचमीला नैसर्गिक रंगांची उधळण करण्याची शपथ विद्यार्थ्यांंना देण्यात आली. रासायनिक रंगांमुळे आरोग्याला कशी इजा पोहोचते यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश शिंदे व अजय खाडे यांनी केले होते.