वाशिम जिल्ह्यात दृष्टीदिन सप्ताहानिमित्त जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:19 PM2018-06-15T16:19:24+5:302018-06-15T16:19:24+5:30
वाशिम: राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत डॉक्टर भालचंद्र स्मृती दृष्टिदिन सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत जनतेत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, शासकीय रुग्णालयांत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
वाशिम: राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत डॉक्टर भालचंद्र स्मृती दृष्टिदिन सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत जनतेत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, शासकीय रुग्णालयांत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत १० जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दृष्टीदिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ११ जून रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामिण रुग्णालयामध्ये व जिल्हा रुग्णालय, येथे नेत्ररुग्णांची तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर तपासणीत मोतिबींदू आढळलेल्या रुग्णांची तपासणी करुन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात १२ जून रोजी नेत्रशस्त्रक्रीयेसाठी भरती करुन व इतर रुग्णांना नेत्रशल्य चिकित्सकाकडून योग्य तो उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. १३ जून रोजी २१ मोतिबींदू रुग्णांवर मोफत अंतरभिंगावरापन नेत्रशस्त्रक्रीया करण्यात आल्या. १४ जून रोजी जिल्हा रुग्णालयात दृष्टीदिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या अध्याक्षतेखाली रुग्ण,नातेवाईक व रुग्णालयीन अधिकारी व कर्मचाºयांची सभा आयोजीत करण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून नेत्र शल्य चिकित्सक डॉ. अविनाश झरे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. आशिष बेदरकर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. एस.एस चांडोळकर यांनी नेत्रदानाबद्दल तसेच डोळयाच्या इतर आजाराबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. नेत्र शस्त्र क्रीया झालेल्या रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांचे हस्ते फळ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. जे.एस. बाहेकर यांनी तर आभार नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी नेत्रचिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे, सुधीर साळवे, ओम राऊत अधिपरिचारिका ढगे, भगत, साबळे आदी कर्मचाºयांनी अथक परिश्रम घेतले.