सात कोल्हापूरी बंधाऱ्यांचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:10 PM2018-10-09T18:10:13+5:302018-10-09T18:10:19+5:30
वशिम : जिल्ह्यातील सात कोल्हापूरी बंधाºयांचा प्रश्न निकाली निघाला असून, सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांमुळे ३५० हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वशिम : जिल्ह्यातील सात कोल्हापूरी बंधाºयांचा प्रश्न निकाली निघाला असून, सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांमुळे ३५० हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. याशिवाय एका लघु सिंचन प्रकल्पाचा प्रश्नही मार्गी लागला असून, यासाठी १.७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
ग्रामीण भागातील शेतजमिन अधिकाधिक प्रमाणात सिंचनाखाली आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फेदेखील कोल्हापूरी बंधारे, लघु सिंचन प्रकल्पांच्या कामांना प्राधान्य दिले जाते. चालू वर्षात जिल्ह्यातील एकूण सात कोल्हापूरी बंधाºयांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यामध्ये वाशिम तालुक्यातील तोंडगाव भाग एक व दोन, रिसोड तालुक्यातील हराळ व बोरखेडी, मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव व लाठी आणि मानोरा तालुक्यातील गुंडी अशा सात कोल्हापूरी बंधाºयांच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजूरात मिळाली असून, सदर कामांची सध्या निविदा प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. तोंडगाव भाग एक येथील कोल्हापूरी बंधाºयासाठी ८५ लाख रुपये, भाग दोन साठी ९० लाख रुपये, हराळ येथे ५७ लाख, बोरखेडी येथे ५९ लाख रुपये, आसेगाव येथे ५४ लाख रुपये, लाठी येथे ९५ लाख रुपये तर गुंडी येथील कोल्हापूरी बंधाºयासाठी ७९ लाख रुपये निधीही मंजूर झाला आहे. यामुळे ३५० हेक्टर जमिन सिंचनखाली येणार असून, यामुळे त्या, त्या परिसरातील शेतकºयांना नवसंजिवणी मिळणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी व्यक्त केला. दरम्यान, गुंडी येथील कोल्हापूरी बंधाºयासाठी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाते.
इलखी लघु सिंचन प्रकल्पासाठी १.७२ कोटींचा निधी
इलखी येथील लघु सिंचन प्रकल्पासाठी १.७२ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असून, तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लघु सिंचन प्रकल्पातून ७० ते ८० हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी सांगितले.