३० सप्टेंबरपर्यंतचा कोटा रिकामा; मुदतीत मिळणार पासिंग, लायसन्स !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:45 AM2021-09-22T04:45:37+5:302021-09-22T04:45:37+5:30

वाशिम : कोरोनाकाळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी मुदत संपलेला शिकाऊ परवाना, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पासिंगसह इतर कामांसाठी ...

Quota empty till September 30; Passing in time, license! | ३० सप्टेंबरपर्यंतचा कोटा रिकामा; मुदतीत मिळणार पासिंग, लायसन्स !

३० सप्टेंबरपर्यंतचा कोटा रिकामा; मुदतीत मिळणार पासिंग, लायसन्स !

Next

वाशिम : कोरोनाकाळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी मुदत संपलेला शिकाऊ परवाना, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पासिंगसह इतर कामांसाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यात ऑनलाइन अपॉइंटमेंट कोटा अद्याप रिकामा असल्याने उमेदवारांना विहित मुदतीत पासिंग, लायसन्स मिळणार आहे.

कोरोनाकाळात संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोरोनाकाळात मुदत संपलेले लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यासह इतर कामांसाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत मुदतवाढीची सूचना प्रसिद्ध केली होती. यात ३० जून २०२१ पर्यंत आणि नंतर ३० सप्टेंबर २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. विहित मुदतीच्या आत शिकाऊ परवाना, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पासिंग यासह इतर कामे पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधितांनी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्या. जिल्ह्यात अद्याप कोटा फुल्ल न झाल्याने ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळत आहेत. त्यामुळे लायसन्स बाद होण्याची भीती राहिली नाही.

०००००

रोजचा ५६चा कोटा

पक्क्या परवान्यासाठी वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रोज ५६चा कोटा आहे. सप्टेंबरपर्यंत हा कोटा फुल्ल झाला नाही. उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात येत आहे.

................

काय होत्या अडचणी?

कोरोनाकाळात शासकीय कार्यालयांतील गर्दीवर नियंत्रण म्हणून उपस्थितीवर मर्यादा आली होती. त्यामुळे परवाना व अन्य कामांसाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली.

ज्या उमेदवारांच्या शिकाऊ परवान्याची मुदत संपली आहे आणि त्यांना मुदतवाढीचा फायदा झाला आहे, त्यांच्यासाठी पक्का वाहनपरवाना काढण्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची मुदत आहे. या मुदतीत शिकाऊ परवाना काढला नाही तर पुन्हा शिकाऊ परवाना काढण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे.

...............

तारीख मिळालेले येत नाहीत !

वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात सप्टेंबर महिन्यातील कोटा फुल्ल झालेला नाही. ज्यांना तारीख मिळाली आहे, त्यातील काहीजण वेळेवर येत नाहीत. परवाना, पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र यासह अन्य कामे विहित मुदतीत व्हावी याकरिता तारीख मिळालेल्या उमेदवारांनी वेळेवर हजर राहणे आवश्यक ठरत आहे.

..............

अपॉइंटमेंट मिळाली; लायसन्सही मिळाले !

शिकाऊ वाहनचालक परवान्यानंतर पक्का परवाना मिळण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळाली. त्यानुसार हजर राहून लायसन्सही मिळाले आहे.

- स्वप्नील खंडारे, वाशिम

........

वाशिम येथे ऑनलाइन अपॉइंटमेंट सहजरीत्या मिळत आहे. त्यामुळे परवाना काढताना गैरसोयीला सामोरे जावे लागत नाही. लायसन्स मिळाले आहे.

- सुरज सरकटे, वाशिम

.....................

ऑनलाइन कोटा शिल्लक आहे

कोट (आरटीओ)

वाशिम येथे ऑनलाइन कोटा शिल्लक आहे. त्यामुळे शिकाऊ परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यांसह अन्य कामे विहित मुदतीत संबंधितांना करता येणार आहेत. सुटीच्या दिवशीदेखील ही सुविधा सुरू राहणार आहे.

- ज्ञानेश्वर हिरडे

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

Web Title: Quota empty till September 30; Passing in time, license!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.