वाशिम : देश सध्या विविध संकटांच्या विळख्यात सापडला असून सर्वसामान्य जनतेला महागाई, सुरक्षसह अनेक समस्या भेड़सावत आहेत. यासाठीच कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून सदर भारत जोडो यात्रेला विविध राज्यातील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे अशी माहिती जयराम रमेश यांनी हॉटेल इव्हेटो येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी माजी मंत्री यशोमती ठाकुर,खासदार प्रणीति शिंदे,आमदार प्रज्ञा सातव आदि उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले की,राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही निवडणुक प्रचारासाठी नव्हे तर देशामध्ये वाढत असलेली महागाई,शेतकऱ्यांच्या समस्या,महिलांवरील अत्याचार,देशात वाढता असंतोष याबाबत जनजागृती करण्यासाठीच ही भारत जोडो यात्रा सुरु असल्याचे म्हटले.भारत जोडो यात्रेला खुप मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत असून ७० टक्के महिलां या यात्रेत सहभागी होत असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली.
चिमुकलीची गोड भेट
भल्या पहाटे म्हणजे २.३० वाजता उठून स्वरा सुमित मिटकरी या चिमुकलीने तयारी केली ती फक्त राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी ... सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वराला कडेवर घेऊन सवांद साधला.... राहुल गांधी यांनी स्वराला कितवी मध्ये आहे, भविष्यात काय करायचं आहे असे अनेक प्रश्न विचारले, स्वरानेही सर्व प्रश्नांची उत्तरं एकदम तडफेने दिली