बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महाराज यांचे पार्थिव पाेहरादेवीकडे रवाना; रविवारी हाेणार अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 04:27 PM2020-10-31T16:27:34+5:302020-10-31T16:35:41+5:30
Sant Ramrao Maharaj News रविवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानाेरा : संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचे मुंबई येथे ३० ऑक्टाेबर राेजी रात्री ११ वाजताच्या सुमारास जगाचा निराेप घेतला. मुंबई येथून त्यांचे पार्थिव पहाटे ४ वाजता पाेहरादेवीकडे भाविकांसह नेले जात आहे. त्यांचे पार्थिव रात्री ११ वाजेपर्यंत पाेहचणार असल्याचे राष्ट्रीय बंजारा परिषद मानाेऱ्याच्यावतिने कळविण्यात आले आहे.
बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामरावबापू महाराज यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून अस्थीर होती. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे लिलावती रुग्णालयात उपचारही करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबई येथे गेले होते. त्यात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार ३० आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टाेबर राेजी पहाटे ४ वाजता डाॅ. रामराव महाराज यांचे पार्थिव मुुंबई येथून पाेहरादेवीकडे रवाना करण्यात आले आहे. वाशी नवी मुंबई येथे ६ वाजता, चाकण पुणे येथे ९ वाजता , नगर धाराशिव ११ वाजता , औरंगाबाद येथे दुपारी १ वाजता, जालना येथे सायंकाळी ४ वाजता , मेहकर येथे ६ वाजता, वाशिम येथे ८ वाजता , धानाेरा येथे रात्री १० वाजता मार्गक्रमण करीत रात्री ११ वाजता पाेहरादेवी येथे पार्थिव पाेहचणार आहे. गर्दी टाळण्यासाठी पाेहरादेवी येथे नाकाबंदी केल्या जात आहे.
पाेलीस विभागाचे पाेलीस पाटील यांना सहकार्याचे आवाहन
महान तपस्वी श्री संत रामराव महाराज यांचे काल रात्री निधन झाले त्यांचा त्यांचा अंत्यविधी ग्राम पोहरादेवी येथे रविवारी हाेणार आहे. या अंत्यविधी कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातून परराज्यातील नागरिक येण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे आपल्याकडे तेवढा पोलीस बंदोबस्त उपस्थित नाही ,त्याकरिता सर्व पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी ३१ ऑक्टाेबर दुपारून दोन वाजल्यापासून ते सोमवारपर्यंत बंदोबस्तकरिता मदत करण्याचे आवाहन मानाेरा पाेलीस स्टेशनचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी केले आहे.