शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:11 PM2020-05-17T17:11:33+5:302020-05-17T17:11:51+5:30

रयत क्रांती संघटनेच्यावतिने अंगणात १५ मे रोजी आंदोलन करण्यात आले.  

Rayat Kranti Sanghatana agitation for various demands of farmers | शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा  : कोरोनाच्या पृष्ठभूमिवर सोशल डिस्टन्सिंग पाळत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतिने अंगणात १५ मे रोजी आंदोलन करण्यात आले.  सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या घेऊन एका आंदोलनाची घोषणा केली होती. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांची व्यथा सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी खोत यांनी लॉकडाऊनचा कोणताही नियम मोडला जाणार नाही अशा पद्धतीचे आंदोलन करण्याची घोषणा केली होती ,त्याच अनुषगांने  १५ मे रोजी रयतक्रांती संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष हर्षद देशमुख यांनी आपल्या राहत्या घरासमोर काही घरातील सदस्य घेऊन दारामध्येच आंदोलन केले.
कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून शेतकº्यांना सर्व पातळ्यांवर मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेने हर्षद देशमुख  यांनी राज्याचे माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले.


- रयत क्रांती संघटनेच्या मागण्या
शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करा, आधारभूत किंमतीने शेतीमाल खरेदी , प्रति क्विंटल १ हजार रुपयांप्रमाणे अनुदान ,  दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्यावे, कोरोनामुळे फळ-भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी यासह ईतर मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: Rayat Kranti Sanghatana agitation for various demands of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.