वसुली१८१ वाहनांची नोंदणी निलंबित

By admin | Published: June 2, 2014 12:45 AM2014-06-02T00:45:13+5:302014-06-02T01:10:55+5:30

वाशिम जिल्ह्यात डेप्यूटी आरटीओंची मोहीम : ३0६.२0 लाख महसूल वसुली.

Recovery 181 Suspended Vehicle Registration | वसुली१८१ वाहनांची नोंदणी निलंबित

वसुली१८१ वाहनांची नोंदणी निलंबित

Next

वाशिम: वाहतुकीच्या नियमांना चिरडत सुसाट वेगाने धावणार्‍या ४३९७ वाहनांवर वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाईचा आसूड ओढला आहे. एप्रिल २0१३ ते मार्च २0१४ या कालावधीत १८१ वाहनांचे नोंदणी निलंबन तर ११६ वाहनांचे परवाने निलंबित केले आहेत. २0१३-१४ या आर्थिक वर्षात विविध प्रकारच्या दंडातून उपप्रादेशिक परिवहन विभागाने ३0६.२0 लाखाचा महसूल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे. वाहनांना परवाना देण्याबरोबरच वाहतूक नियमांना पायदळी तुडविणार्‍यांकडून दंड वसूल करण्याची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन विभागावर सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध वाहतुकीला ताळावर आणण्यासाठी वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल २0१३ ते मार्च २0१४ या आर्थिक वर्षात कारवाईची मोहीम राबविली. एप्रिल १३ ते मार्च १४ या दरम्यान ९१0९ वाहनांची तपासणी केली. ४३९७ वाहनांनी वाहतुकीच्या नियमांना चिरडल्याचे आढळून आले. क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली. १७३४ मालवाहू वाहनांची तपासणी केली असता ८२१ दोषी वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १,१४,0३,९00 दंड वसूली केली आहे. २८४५ प्रवासी वाहनांची तपासणी केली असता १३७0 वाहनं दोषी आढळली. १८१ वाहनांचे नोंदणी निलंबन केले तर ११६ वाहनांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केली आहे.

Web Title: Recovery 181 Suspended Vehicle Registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.