भेसळयुक्त बियाण्यांचा अहवाल वरिष्ठांकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:05 AM2017-08-15T01:05:57+5:302017-08-15T01:06:14+5:30
मंगरुळपीर: महाबीजकडून घेतलेल्या बियाण्यांत भेसळ असल्याच्या तक्रारी मंगरुळपीर तालुक्यातील चार शेतकर्यांनी कृषी विभागाकडे केल्या होत्या. या संदर्भात लोकमतने २ ऑगस्ट रोजी पाठपुरावा केल्यानंतर पंदेकृविचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांनी संबंधित शेताची पाहणी केल्यानंतर भेसळ झाल्याचे त्यांना आढळून आले. याप्रकरणी उपरोक्त चमूच्या पाहणीतील निष्कर्षाचा अहवाल पाठविण्यास विलंब होत असल्याबाबत लोकमतने ६ ऑगस्ट रोजी ‘भेसळयुक्त बियाण्यांचा अहवाल पाठविण्यास विलंब’ या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले. याची दखल घेत हा अहवाल तातडीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांकडे पाठविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी गोविंदा भगत यांनी यंदाच्या हंगामात पेरणीसाठी खरेदी -विक्री संघाकडून सोयाबीनचे अनुदानित बियाणे विकत घेतले. त्याची पेरणी केल्यानंतर उगविलेली झाडे पाहिली असता. त्यामध्ये त्यांनी मागणी केलेल्या बियाण्यांच्या झाडांचे प्रमाण अत्यंत कमी आणि इतर वाणाच्या बियाण्यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. त्यांनी यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली, तसेच लोकमतनेही यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले.
त्याची कृषी विभागाने दखल घेतली आणि पंदेकृविचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांनी संबंधित शेताची पाहणी केली. त्यावेळी सदर शेतकर्याच्या मागणीनुसार, देण्यात आलेल्या महाबीजच्या जेएस-९३0५ या वाणाची झाडे केवळ ३0 टक्के, तर इतर मिश्र वाणाची ७0 टक्के झाडे असल्याचे आढळून आले. दरम्यान, कृषी विभागाच्या चमूने तालुक्यातील वाढा येथील प्रताप बाबरे, विनोद बाबरे, सुरेखा बाबरे या शेतकर्यांच्या शेतातही पाहणी के ली होती. त्यांच्या शेतातही भेसळीचे प्रमाण आढळून आले. यासंदर्भात त्यांच्याकडून वरिष्ठांकडे तातडीने अहवाल पाठविणे अपेक्षित होते; परंतु त्याला विलंब झाला.
यासंदर्भात ५ ऑगस्ट रोजी पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी तातडीने अहवाल तयार करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांकडे पाठविला.