पवित्र प्रणाली पदभरती प्रक्रियेचा ‘व्हीसी’व्दारे आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:36 PM2019-02-12T17:36:09+5:302019-02-12T17:36:30+5:30
वाशिम : पवित्र प्रणाली पदभरती आणि शिक्षक समायोजनासंबंधी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेचा बुधवार, १३ फेब्रुवारी रोजी ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’व्दारे आढावा घेतला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पवित्र प्रणाली पदभरती आणि शिक्षक समायोजनासंबंधी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेचा बुधवार, १३ फेब्रुवारी रोजी ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’व्दारे आढावा घेतला जाणार आहे. तशा सूचना जिल्हास्तरावरील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्याची शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली.
पवित्र प्रणालीमध्ये संबंधित शैक्षणिक संस्थांकडून बिंदू नामावली भरून घेणे व संस्थांनी भरलेली बिंदू नामावली कायम करणे, शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती घेणे, प्रलंबित बिंदू नामावलीच्या याद्या ‘मावक’ यांच्याकडे देणे, त्रुटी असलेल्या संस्थांना त्याच्या पुर्ततेबाबत कळविणे व ‘मावक’शी समन्वय ठेवून बिंदू नामावली पूर्ण करणे, आदी महत्वाच्या मुद्यांवर ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’मध्ये चर्चा होणार आहे. संबंधितांनी या ‘व्हीसी’त सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.