माझी वसुंधरा अभियानात रिसोड नगर परिषद अव्वल; मंगरूळपीर माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 12:36 PM2021-06-07T12:36:51+5:302021-06-07T12:37:00+5:30

Risod Municipal Council tops my Vasundhara campaign : अमरावती विभागात पहिला येण्याचा बहुमान रिसोड परिषदेने पटकाविला.

Risod Municipal Council tops my Vasundhara campaign | माझी वसुंधरा अभियानात रिसोड नगर परिषद अव्वल; मंगरूळपीर माघारले

माझी वसुंधरा अभियानात रिसोड नगर परिषद अव्वल; मंगरूळपीर माघारले

googlenewsNext

लोकमत न्यूज  नेटवर्क
वाशिम : भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. पर्यावरणदिनी ५ जून रोजी या स्पर्धेचे निकाल घोषित झाले असून, यामध्ये जिल्ह्यासह अमरावती विभागात पहिला येण्याचा बहुमान रिसोड परिषदेने पटकाविला. वाशिम नगरपरिषद जिल्ह्यात चौथ्या, तर मंगरूळपीर नगरपरिषद सर्वात शेवटच्या अर्थात सहाव्या क्रमांकावर आहे.
शहराची स्वच्छता राखली जावी यासह पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे यासाठी स्पर्धाही घेण्यात आली. 
वृक्षारोपण, कचरा संकलनासाठी घंटागाड्यांचा वापर, सुका व ओल्या कचऱ्याचे विलगीकरण, वायु गुणवत्ता तपासणी यासाठी विविध उपक्रम नगरपरिषद, नगरपंचायतीने राबविले. शहरात हरितकरण वाढविण्यासाठी उद्याने संवर्धन व सौंदर्यीकरण, रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबविणे अपेक्षित होते. या स्पर्धेचा निकाल ५ जून रोजी जाहीर झाला असून यामध्ये रिसोड नगरपरिषद अव्वल ठरली आहे. रिसोड नगरपरिषदेला ३३२ गुण मिळाले आहेत.
 दि्वतीय क्रमांकावर २७८ गुण घेत कारंजा नगरपरिषद, तृतीय क्रमांकावर मालेगाव नगरपंचायत, चौथ्या क्रमांकावर वाशिम नगरपरिषद, पाचव्या क्रमांकावर मानोरा नगरपंचायत, तर सहाव्या क्रमांकावर मंगरूळपीर नगरपरिषद आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Risod Municipal Council tops my Vasundhara campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.