पर्यटन क्षेत्र शिरपुरातील रस्ते विकास खोळंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:28 AM2021-06-17T04:28:02+5:302021-06-17T04:28:02+5:30

शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका ठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे करंजी, वाशिम, शेलगाव बगाडेकडे जाणाऱ्या ...

Road development in the tourism sector Shirpur was hampered | पर्यटन क्षेत्र शिरपुरातील रस्ते विकास खोळंबला

पर्यटन क्षेत्र शिरपुरातील रस्ते विकास खोळंबला

Next

शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका ठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे करंजी, वाशिम, शेलगाव बगाडेकडे जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. इतर ठिकाणचे अंतर्गत रस्तेही खराब झाल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

बसथांबा ते जैन मंदिर रस्ता, जगदंबा देवी मंदिराकडे जाणारा रस्ता, प्रामुख्याने जानगीर महाराज संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर फरशी पुलालगतचा रस्ता खराब होऊन खळगे निर्माण झाले आहे. सध्या तेथे मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या जानगीर महाराज संस्थानकडे जाणाऱ्या लोकांसह करंजी, वाशिम, शेलगाव बोंदाडे व परिसरातील शेतात जाव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी राम देशमुख यांनी केली आहे.

Web Title: Road development in the tourism sector Shirpur was hampered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.