लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. बहुतांश रस्ते तर चक्क खरडून गेले आहे. यासह असंख्य खड्डयांमुळे नागरिकांना मणक्याचे आजार जडत आहेत. यामुळे दुचाकी चालक धास्तावले असताना नगर पंचायत प्रशासनाचे मात्र या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर सर्वच स्तरातून उमटत आहे.शहरातून तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ता, नवीन बसस्थानकाकडून आठवडी बाजाराकडे जाणाºया रस्त्यांना सद्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शहरात काही मोबाइल कंपन्यांनी ‘अंडरग्राऊंड केबल’ टाकताना रस्ते खोदून ठेवले आहेत. काहीठिकाणी सिमेंट-काँक्रीटचे जुने रस्ते खरडून जावून गज बाहेर निघाले आहेत. अशा खरडलेल्या व खड्डे पडलेल्या रस्त्यांच्या समस्येमुळे अनेक नागरिकांना विशेषत: मणक्याच्या आजारास सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष पुरवून नगर पंचायतीने पूर्णत: क्षतीग्रस्त झालेल्या रस्त्यांचे नुतनीकरण; तर काहीठिकाणच्या रस्त्यांची विनाविलंब डागडूजी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अलीकडच्या काळात मणक्याचे दुखणे घेऊन येणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहन खड्डयांमधून आदळल्याने संबंधितांमध्ये हा त्रास बळावत चालला आहे. अशा रुग्णांनी वाहन न चालविता पर्यायी व्यवस्थाच केलेली बरी. - डॉ. पवन मानधने, मालेगाव
मालेगावातील रस्त्यांची दुरवस्था ; खड्डयांमुळे जडताहेत मणक्याचे आजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 6:34 PM