वाशिम जिल्ह्यातील पोलिस निवासस्थानांसाठी ५९.५० कोटींचा निधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 06:29 PM2019-02-10T18:29:39+5:302019-02-10T18:30:01+5:30
वाशिम : जिल्ह्यातील पोलिसांना हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून राज्य शासनाने यासाठी लागणारा ५९.५० कोटींच्या निधीस मंजूरात दर्शविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील पोलिसांना हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून राज्य शासनाने यासाठी लागणारा ५९.५० कोटींच्या निधीस मंजूरात दर्शविली आहे. त्यातून लवकरच पोलिसांसाठी २०० निवासस्थान उभारण्यात येणार आहेत.
सन १९९८ ला अकोला जिल्ह्याचे विभाजन होवून वाशिम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यासोबतच जिल्हास्तरावरील कार्यालये देखील वाशिममध्ये सुरू झाली. मात्र, तेव्हापासूनच जिल्ह्यातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. दरम्यानच्या काळात स्थानिक सिव्हील लाईन परिसरात काही निवासस्थाने उभारण्यात आली असली तरी, जिल्ह्यात कार्यरत पोलीस मनुष्यबळाच्या तुलनेत त्यांची संख्या अत्यंत तोकडी होती. त्यामुळे पोलिसांना भाड्याच्या घरातच दिवस काढावे लागत होते. हक्काच्या घरासाठी पोलिसांची होणारी परवड लक्षात घेत शासनाने जिल्ह्यातील २०० पोलिस निवासस्थानांसाठी ५९.५० कोटींचा निधी मंजूर केला. यासाठी आमदार राजेंद्र पाटणी यांनी पुढाकार घेतला होता, हे विशेष.