संजय गांधी योजनेची १५४ पैकी ९९ प्रकरणं मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:35 PM2019-06-21T14:35:27+5:302019-06-21T14:35:55+5:30
दिवसभरात एकूण १५४ प्रकरणांपैकी ९९ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तहसील कार्यालयात २० जून रोजी संजय गांधी निराधार योजना समितीची सभा पार पडली असून दिवसभरात एकूण १५४ प्रकरणांपैकी ९९ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.
तहसील कार्यालयात पार पडलेल्या या सभेत प्रारंभी तहसीलदार किशोर बागडे यांनी समितीच्या अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार केला. तसेच यावेळी श्रावणबाळ योजनेच्या एकूण ३९ अर्जांपैकी ३१ अर्ज मंजूर तर ८ अर्ज नामंजूर करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या एकूण ११५ अर्जांपैकी ६८ मंजूर तर ४७ अर्ज नामंजूर करण्यात आले. सभेला तहसीलदार किशोर बागडे यांचेसह समितीचे अध्यक्ष व सदस्य आत्माराम पवार, संदीपान भगत, ज्योतिराम राठोड, डिगांबर भोयर, गंगादीप राऊत, मनोज जोशी, अव्वल कारकून एस.जी. शिंदे यांची उपस्थिती होती.