पीककर्जासाठी बँकेतच मिळणार सातबारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:31 PM2020-11-09T12:31:03+5:302020-11-09T12:31:27+5:30

Washim News वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील पीककर्जासाठी बँकेतच ऑनलाईन पद्धतीने सातबारा उपलब्ध होणार आहे.

Satbara will be available in the bank for crop loan only! | पीककर्जासाठी बँकेतच मिळणार सातबारा !

पीककर्जासाठी बँकेतच मिळणार सातबारा !

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता राष्ट्रीयकृत बँकेतच सातबारा मिळणार असल्याने सेतु केंद्र किंवा तलाठी कार्यालयाकडे जाण्याची गरज नाही. जमाबंदी आयुक्त विभागाकडून राज्यातील २३ बँकांशी सामंजस्य करार झाल्याने वाशिम जिल्ह्यातही ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
कोणत्याही प्रकारचे कर्ज काढण्यासाठी शेतकरी किंवा जमीनधारकांना सातबारा सादर करणे बंधनकारक आहे. सातबाऱ्याला ऑनलाइनची जोड देण्यात आली असून, तलाठी, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतु केंद्रातून संगणकीकृत सातबारा दिला जातो. पीककर्ज काढण्यासाठी शेतकºयांना सातबारा सादर करावा लागत असल्याने यासाठी तलाठी कार्यालय किंवा सेतु केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत होते. अनेकवेळा कनेक्टिव्हिटी नसल्याने सातबारा मिळण्यास विलंब होत होता. शेतकºयांची ही गैरसोय टाळण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने बँकिंग पोर्टल विकसित करण्यात आले. 
याद्वारे राज्यातील कोणत्याही गावचे सातबारा, खाते उतारे व ऑनलाईनला नोंदविलेले डिजिटल स्वाक्षरीतील उतारे, फेरफार बँक किंवा वित्तीय संस्थांना प्रत्येकी १५ रुपये नक्कल शुल्क भरून ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे. 
या पोर्टलची सेवा मिळण्यासाठी आतापर्यंत २३ बँकांनी सामंजस्य करार केला आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील पीककर्जासाठी बँकेतच ऑनलाईन पद्धतीने सातबारा उपलब्ध होणार आहे, याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी केले.
 

पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेतच संगणकीकृत व डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांना सेतू केंद्र किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही. ही सुविधा वाशिम जिल्ह्यातही सुरू झाली आहे.
- दत्तात्रय निनावकर
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक वाशिम.

Web Title: Satbara will be available in the bank for crop loan only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.