मंगरुळपीर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत व यावर्षीच्या उन्हाळ्यात मंगरुळपीरमध्ये पाणी टंचाईने केलेला उच्चांकी कहर लक्षात घेत आमदल व जे फाईव्ह फाउंडेशनच्यावतीने तळ गाठलेल्या भुजल पातळीत वाढ होण्यासाठी मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर जलरक्षा आंदोलनाचा एक भाग म्हणुन ५ जुन २०१८ रोजी मंगळवार रोजी ११ ते २ या वेळेत आत्मत्रास सत्याग्रह करण्यात आला.
हा सत्याग्रह आमदल प्रमुख तथा जे फाईव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष गंगाधर कांबळे यांचे नेतृत्वात पार पडला . यावेळी प्रमुख उपस्थितीत राज्य स्वच्छता दुत संगीता अव्हाळे, भास्कर पाटील मुळे, माजी मंडळ अधिकारी वसंतराव बडवे, माळी महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळे, राज्य पुरस्कारप्राप्त भगवान पिसोळे, अनिता पंडीत, इरफानभाई, अनिल पडघान, राजभाऊ आमटे यांची होती. या सत्याग्रहाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शासकीय व खाजगी मोठ्या इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टींग न करणाºया संबंधीतांवर तात्काळ कडक कारवाई करा, जुने व नवे सार्वजनिक जलस्त्रोत पुनर्जिवीत करा, घर तिथं शोषखड्डा ही मोहीम सक्तीची करा, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी पुन्हा वापरण्यायोग्य बनवुन उपलब्ध करुन दिले पाहिजे, बेसुमार होणाºया भुजल उपशावर कडक निर्बंध घातले पाहिजे, वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांची पाणीपट्टी माफ करुन त्या गावांना विशेष अतिरिक्त अनुदान प्रदान केले पाहिजे या मागण्यांचा समावेश आहे. यानंतर पुढील आत्मत्रास सत्याग्रह वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचा निर्णय सत्याग्रहींकडून घेण्यात आला. येथे करण्यात आलेल्या या आत्मत्रास सत्याग्रह मध्ये हरिभाऊ इंगोले, ज्ञानेश्वर तायडे, भास्करराव अव्हाळे, महादेव अडोळे, पारर्वेकर, मंगेश तिडके, प्रकाश काकडे पाटील, गोपाल पन्नासे, रवि खंडारे, भारत खडसे, किशोर काजळे मिलींद इंगोले , सुभाष हातोलकर अनिल गावंडे यांचासह परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.