एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 05:48 PM2019-10-04T17:48:06+5:302019-10-04T17:48:11+5:30

अधिकारी, कर्मचाºयांकडे (रोजंदार व अर्धवेळ कर्मचाºयांसह) सुधारीत शिष्यवृत्ती व बक्षीसासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.

Scholarships will be awarded to ST staff members | एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी महामंडळाच्यावतीने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून, या संदर्भातील सुचना विभागस्तरावरून देण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळाच्या १३ आॅक्टोबर २००८ च्या ठरावानुसार एसटी कर्मचाºयांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत असते. या ठरावानुसार एसटी कर्मचाºयांच्या ३५० पाल्यांना शिष्यवृत्ती मंजूर केल्यानंतर राहिलेल्या अर्जांमधून गुणानुक्रमे १०० पाल्यांना बक्षीसे मंजूर करण्यात येतात. प्रत्येक विभाग, घटकासाठी १० शिष्यवृत्ती मंजूर केल्या जातात. आता मार्च २०१९ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परिक्षेत ज्यांची मुले, मुली पहिल्या प्रयत्नात ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत, अशा अधिकारी, कर्मचाºयांकडे (रोजंदार व अर्धवेळ कर्मचाºयांसह) सुधारीत शिष्यवृत्ती व बक्षीसासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. महामंडळाच्या या उपक्रमामुळे शेकडो अधिकारी, कर्मचाºयांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान, ज्या अधिकारी, कर्मचाºयास तीन पेक्षा अधिक मुले आहेत. तसेच १ मे २००१ पूवीृ ज्यांना दोन मुले आहेत. त्यांना २००१ नंतर तिसरे अपत्य झाले असल्यास, अशा अधिकारी, कर्मचाºयांचे पाल्य शिष्यवृत्तीस पात्र ठरणार नाहीत.

Web Title: Scholarships will be awarded to ST staff members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.