पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार ; पालकांमध्ये धाकधूक कायम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:35 AM2021-01-17T04:35:45+5:302021-01-17T04:35:45+5:30
नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थी वयाने मोठे असतानाही, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पालकांमध्ये धाकधूक कायम होती. कोरोनाचा आलेख खाली येत ...
नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थी वयाने मोठे असतानाही, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पालकांमध्ये धाकधूक कायम होती. कोरोनाचा आलेख खाली येत असल्यामुळे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत आहेत. दरम्यान, पाचवी, सहावीतील विद्यार्थ्याचे वय कमी असल्याने आणि प्राथमिक शाळांमध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन होईल की नाही याबाबत संभ्रम असल्याने पालकांमध्ये धाकधूक कायम असल्याचे दिसून येते. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व अन्य सुविधा शाळा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात, असा सूर जिल्ह्यातील पालकांमधून उमटत आहे.
०००
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
पाचवी ७१००
सहावी ५८२४
सातवी ५५००
आठवी ११५०
००
पालकांना काय वाटते ?
आवश्यक ती खबरदारी घेऊन शाळा सुरू व्हायला हव्या. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, कोरोनाविषयक नियमांचे पालन शाळा प्रशासनाकडून व्हायला हवे.
विनोद बसंतवाणी, पालक
पाचवी, सहावीतील मुले लहान असल्यामुळे शाळा प्रशासनाने अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे.
डाॅ.सुनिता लाहोरे, पालक
शाळा सुरू करताना कोरोनाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी.
प्रमोद ढाकरके, पालक
००
जिल्ह्यातील शाळांची संख्या ८३४
जिल्ह्यातील शिक्षक संख्या ३५४०
००
बारावीमध्ये ७० टक्के उपस्थिती
इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. या वर्गात ८२ हजारावर विद्यार्थी असून, आतापर्यंत जवळपास ७० टक्के अर्थात ५७ हजार विद्यार्थी उपस्थित असल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील शाळेतून आतापर्यंत एकालाही कोरोना संसर्ग झाला नाही, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.