शाळांतील वीजजोडणीसाठी प्रशासनातर्फे चाचपणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:53 PM2018-06-12T17:53:20+5:302018-06-12T17:53:20+5:30
वाशिम - जिल्ह्यातील सर्व शाळांना डिजिटल वर्गखोलीची जोड देण्यासाठी वीजजोडणी आवश्यक आहे. त्या अनुषंगाने किती शाळांना वीजजोडणी नाही, याची चाचपणी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे.
वाशिम - जिल्ह्यातील सर्व शाळांना डिजिटल वर्गखोलीची जोड देण्यासाठी वीजजोडणी आवश्यक आहे. त्या अनुषंगाने किती शाळांना वीजजोडणी नाही, याची चाचपणी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे.
देशातील ११५ मागास जिल्ह्याचा कालबद्ध विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या सहयोगाने नीती आयोग ‘कन्वर्जन्स, इन्टग्रेशन अँड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट’ हा उपक्रम राबवित आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात निधी तरतूददेखील करण्यात आली आहे. पोषण, आरोग्य, शिक्षण, मुलभूत पायाभूत सुविधा, कृषी आणि जलसंधारण, आर्थिक समावेशकता आणि कौशल्य विकास या विषयाच्या अनुषंगाने मागास जिल्ह्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षण, आरोग्य, मुलभूत पायाभूत सुविधा या विषयाला सर्वाधिक प्राधान्य असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे चाचपणी केली जात आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्याप वीजपुरवठा पोहोचला नाही. त्यामुळे या ठिकाणी डिजिटल स्कूल ही संकल्पना राबविणे कठीण आहे. अशा ठिकाणांचा शोध घेतल्यानंतर याची इत्यंभूत माहिती महावितरणकडे दिली जाणार आहे. अशा शाळांमध्ये वीजजोडणी देण्यासाठी आवश्यक तेथे विद्युत खांब उभारणी केली जाणार आहे. जास्त लोकसंख्येच्या गावातील जिल्हा परिषद शाळांवर लक्ष केंद्रीत करून येथे आवश्यक त्या मुलभुत भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.