‘सेक्युरा’ला मिळाली नाही डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:55+5:302021-02-27T04:55:55+5:30
जिल्हा प्रशासनाने गतवर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात वाशिम-मालेगाव रस्त्यावर असलेल्या सेक्युरा हॉस्पिटलला डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता दिली ...
जिल्हा प्रशासनाने गतवर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात वाशिम-मालेगाव रस्त्यावर असलेल्या सेक्युरा हॉस्पिटलला डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता दिली होती. या हॉस्पिटलमध्ये दीड हजारांवर कोरोना बाधीत रुग्णांनी उपचारदेखिल घेतले. त्यासाठी प्रशासनाने नेमके किती शुल्क आकारावे, हे ठरवून दिलेले होते; परंतु नियम डावलून सेक्युरा हॉस्पिटलने अतिरिक्त शुल्क आकारले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर भरारी पथक गठीत करून चौकशी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात १४९, दुसºया टप्प्यात ५९ आणि तिसºया टप्प्यात यामाध्यमातून ६० अशा एकूण २६७ रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून सेक्युरा हॉस्पिटलने आतापर्यंत शंभरावर लोकांकडून अतिरिक्त शुल्कापोटी आकारलेली रक्कम धनादेशाव्दारे परत केलेली आहे; मात्र आणखीनही बरेच लोक शिल्लक आहेत. अशात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढली असताना सेक्युरा हॉस्पिटलला आता डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल चालविण्यास मान्यता दर्शविण्यात आलेली नाही.