.....................
‘ते’ कर्मचारी अद्याप मानधनाविना
वाशिम : गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप मानधन मिळालेले नाही. निवडणूक विभागाने ते अदा करावे, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
..................
‘बीएसएनएल’च्या सेवेत व्यत्यय
वाशिम : प्रामुख्याने प्रशासकीय कार्यालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बीएसएनएल दूरध्वनीची सेवा अधूनमधून व्यत्यय निर्माण होत असल्याने अधिकारी, कर्मचारी वैतागले आहेत. सेवा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.
.................
विद्युत उपकेंद्रांची कामे रखडली
वाशिम : सेनगाव (जि. हिंगोली) येथील १३२ के.व्ही. पॉवरहाऊसमधून विद्युतप्रवाह घेण्यासाठी लाईन टाकण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने दोन विद्युत उपकेंद्रांची कामे रखडली आहेत. यामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांना सिंचनात अडथळा जाणवत आहे.
...............
लक्षणे असल्यास तातडीने चाचणी करा !
वाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत परिणामकारक घट झालेली आहे, ही बाब आनंददायक असली तरी लक्षणे दिसून आल्यास तातडीने चाचणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले.
.................
शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
वाशिम : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मूग पिकाचे अतोनात नुकसान झाले. तसेच यावर्षीदेखील १९ ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या गारपिटीने पिकांची हानी झाली. असे असताना अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.