वाशिम जिल्ह्यात आणखी सात जणांचा मृत्यू; ४५ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:10 PM2020-10-27T13:10:53+5:302020-10-27T13:10:58+5:30
CoronaVirus in Washim गत दोन दिवसात सात जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत १३४ जणांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असला, तरी मृत्यूसत्र कायम असल्याचे दिसून येते. रविवारी चार आणि सोमवारी तीन अशा एकूण सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. दरम्यान गत दोन दिवसात ४५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला तर ९७ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात कोराेनाचा आलेख काही अंशी घसरत आहे. मात्र, मृत्यूसत्र कायम असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. गत दोन दिवसात सात जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत १३४ जणांचा मृत्यू झाला. रविवारी २१ आणि सोमवारी २४ असे दोन दिवसात ४५ जण पाॅझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम कारागृह निवासस्थाने परिसर १, शहरातील इतर ठिकाणचा १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसर १, आनंदवाडी २, शुक्रवार पेठ १, ड्रिमलँड सिटी १, चंडिकावेस १, तिरूपती सिटी २, आययुडीपी येथील १, ईश्वरी कॉलनी परिस १, मोहगव्हाण १, शेलगाव १, अडोळी १, मंगरूळपीर तालुक्यातील नागी १, फाळेगाव १, लाठी २, गणेशपूर येथील १, चकवा येथील १, मानोरा तालुक्यातील सोमेश्वर नगर १, पोहरादेवी ३, फुलउमरी ३, उमरी बु. २, कारंजा शहरातील २, काकडशिवणी ६, कामरगाव २, रिसोड शहरातील ३, हिवरा पेन येथील १, वाकद येथील १ अशा ४५ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५६१२ झाली. यापैकी आतापर्यंत ४९४५ जण बरे झाले.