शिवसेनेचे सरकार स्थापन होत नसल्याने उद्विग्न शिवसैनिकाने स्वत:लाच ‘ब्लेड’ मारून केले जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:27 PM2019-11-24T18:27:43+5:302019-11-24T18:27:51+5:30

रमेश बाळू जाधव असे त्याचे नाव असून मानोरा तलुक्यातील उमरी खुर्द  येथील रहिवाशी आहे. 

Shiv Sena activist injured himself by hitting blade | शिवसेनेचे सरकार स्थापन होत नसल्याने उद्विग्न शिवसैनिकाने स्वत:लाच ‘ब्लेड’ मारून केले जखमी 

शिवसेनेचे सरकार स्थापन होत नसल्याने उद्विग्न शिवसैनिकाने स्वत:लाच ‘ब्लेड’ मारून केले जखमी 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मानोरा (वाशिम) : राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होण्याच्या घडामोडी सुरू असताना अचानक भाजपाने सरकार स्थापन केल्याने ऊद्विग्न झालेल्या मानोरा तालुक्यातील एका शिवसैनिकाने ‘ब्लेड’ मारून घेत स्वत:लाच जखमी केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील मानोरा चौकात २४ नोव्हेंबर रोजी घडली. रमेश बाळू जाधव असे त्याचे नाव असून मानोरा तलुक्यातील उमरी खुर्द  येथील रहिवाशी आहे. 
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याने व शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन न झाल्याने आपण हे पाऊल उचलले असल्याचे रमेश जाधव सांगत होते. त्यांनी दिग्रस येथील मानोरा चौकात ‘ब्लेड’ने स्वत: च्या हातावर वार करावयास सुरवात केल्यावर तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक हवालदार युवराज चव्हाण यांनी डिबी पथकाच्या मदतीने सदर शिवसैनिकास ताब्यात घेतले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सदर इसमाची प्रकृती धोक्याबाहेर असून, उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सुटीही देण्यात आल्याचे कळले आहे.

Web Title: Shiv Sena activist injured himself by hitting blade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.