जानगीर महाराज संस्थानवर साध्या पद्धतीने शिवरात्री साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:15 AM2021-03-13T05:15:53+5:302021-03-13T05:15:53+5:30
शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थानमध्ये दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्याा उत्साहात साजरा करण्यात येतो. महाशिवरात्री उत्सवानिमित्त संस्थान मध्ये श्रीमद् ...
शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थानमध्ये दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्याा उत्साहात साजरा करण्यात येतो. महाशिवरात्री उत्सवानिमित्त संस्थान मध्ये श्रीमद् भागवत कथा, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद तसेच पालखी सोहळा मिरवणूक असे कार्यक्रम पार पडत असतात. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त पंचक्रोशीतील ४० ते ५० हजार भाविक जानगीर महाराज संस्थान मध्ये दर्शनासाठी येत असतात. दुसºया दिवशी महाप्रसादाला तर ७५ हजारांहून अधिक भाविक हजेरी लावत असतात; परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी प्रकारचे धार्मिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त ११ मार्च रोजी जानगीर महाराज संस्थान मंदिर अत्यंत साध्यापद्धतीने सिद्धेश्वराचे पूजन व आरती करण्यात आली. प्रशासनाने भाविकांना दर्शनासाठी अगोदरच मनाई केली होती. संस्थानच्या प्रवेशद्वारावरच प्रशासनाने बॅरिकेड्स लावले होते. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत ११ मार्च रोजीचे कार्यक्रम पार पडले. जानगीर महाराज संस्थानच्या इतिहासात प्रथमच महाशिवरात्रीसह महाप्रसादाचा कार्यक्रमहीरद्द झाला आहे. महाप्रसाद नाही आणि देवदर्शनही नाही, त्यामुळे भाविकांत नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, महाप्रसादाच्या दिवशी प्रथम संत हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्ग्याला महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा परंपरा यंदाही जोपासली जाणार आहे. संस्थानचे केवळ चार ते पाच पुजारी हजरत मियॉ बाबा यांच्या दर्ग्यात शुक्रवारी नैवेद्य घेऊन जातील.