कामरगाव येथील जिल्हा परिषद महाविद्यालयासमोरील मुख्य चौकामधील दारूचे दुकान हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश इंगळे यांनी सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. २० वर्षांपूर्वी हे देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी कामरगाव ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. शाळेपासून अवघ्या २०० मीटरच्या आत असलेल्या परिसरात देशी दारूचे दुकान थाटण्यात आले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि पालक यांना मोठा त्रास होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दुकान हटवण्याकरिता मागणी केली जात आहे. मात्र उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. आता गेल्या सहा दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते प्रकाश इंगळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
दारू दुकानाविरोधातील उपोषणाला उलटले सहा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:27 AM