मंगरुळपीर : शहरातील सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात व क्रिडा संकुलासमोर मोठ्या शोषखड्डे करण्यात येत आहेत. या कामाचा शुभारंभ ११ जून रोजी करण्यात आला. नायब तहसिलदार सागर कुळकर्णी यांच्या हस्ते व नगरसेवक पुरूषोत्तम चितलांगे, जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी, पुरवठा निरीक्षक अवताडे, प्राचार्य खांबलकर, प्रमोदसिंग ठाकूर, मनोज जोशी ह्यांच्या हस्ते जेसीबी मशीन व भूपुजन करून जि.प. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्रांगणात कामाचा प्रारंभ करण्यात आला. क्रिडा संकुल परीसरात शेतकरी नेते तथा जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर यांच्या हस्ते व जय भवानी मित्र मंडळ अध्यक्ष प्रविण घोडचर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास खडसे, सचिन कुळकर्णी, सखाराम चेके यांच्या प्रमुख उपस्थितीत पुजन करून कामाचा प्रारंभ झाला. दरवर्षी पावसाळ्यात शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी हे भर रस्त्यावर साचते. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. संपूर्ण प्रांगणातील हे पाणी जवळ जवळ १००़ ते २०० मिटर परिसरात साचून राहते. फक्त बाष्पीभवनाद्वारेच हे लाखो लिटर्स पाणी वाया जाते. शिवाजी महाराजाच्या तैलचित्रामागे संरक्षण भिंतीच्या आत पडीक पडलेल्या जागेत भव्य शोषखड्डा निर्माण केल्या जात आहे. भूजल पातळीत वाढ होवून दरवर्षी गवळीपुरा व मठ मोहल्लामध्ये आटणाºया विंधन विहीरीना कायम जलसाठा राहू शकतो, असा दावा यावेळी करण्यात आला. यापूर्वी वाया जाणाºया पावसाच्या पाण्याचा सदुपयोग करून भूजल पातळीत वाढ केल्या जावू शकते. या कामासाठी तहसिलदार वैशाख वाहुरवाघ व सचिन कुळकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे.
पाणी जिरवण्यासाठी शोषखड्ड्याला प्राधान्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 3:10 PM
मंगरुळपीर : शहरातील सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात व क्रिडा संकुलासमोर मोठ्या शोषखड्डे करण्यात येत आहेत. या कामाचा शुभारंभ ११ जून रोजी करण्यात आला.
ठळक मुद्देशिवाजी महाराजाच्या तैलचित्रामागे संरक्षण भिंतीच्या आत पडीक पडलेल्या जागेत भव्य शोषखड्डा निर्माण केल्या जात आहे. या कामासाठी तहसिलदार वैशाख वाहुरवाघ व सचिन कुळकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे.