सौर कृषीपंपाच्या व्यर्थ ठरणाऱ्या वीजेचा होणार वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 02:25 PM2019-11-27T14:25:11+5:302019-11-27T14:25:56+5:30

वर्षातील इतर ३०० दिवस हा सौर उर्जा संच उर्जानिर्मिती करीत असतानाही उपयोगात येत नाही.

 Solar power will be use for other purpose | सौर कृषीपंपाच्या व्यर्थ ठरणाऱ्या वीजेचा होणार वापर!

सौर कृषीपंपाच्या व्यर्थ ठरणाऱ्या वीजेचा होणार वापर!

Next

- दादाराव गायकवाड 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकऱ्यांना सौर कृषीपंप योजनेंतर्गंत मिळालेल्या सौर पंपाचा वापर वर्षातील जेमतेम ६५ दिवस होतो. उर्वरित ३०० दिवस यातून निर्माण होणारी वीज मात्र वाया जाते. ही वीजही वापरता यावी आणि शेतकºयांना त्याचा फायदा व्हावा म्हणून जिल्ह्यातील वंदे गोमातरम शेतकरी बचत गटाने ही वीज संकलित करून महावितरणला वितरीत करण्याचा प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. त्यासाठी गट नोंदणीस कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, कृषी विभागाची त्याला मंजुरीही मिळाली आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रक ल्प ठरणार आहे.
शेतकºयांना आता पारंपरिक उर्जेची जोडणी देण्याऐवजी सौरउर्जा संच अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. ही प्रक्रिया कृषी विभाग व महावितरणच्या संयुक्त विद्यमाने पार पाडण्यात येते. शेतकºयांनी हे संच शेतात बसविल्यानंतर त्याचा रब्बी हंगामातील सिंचनासह इतर आवश्यक वेळेत होणारा वापर मिळून केवळ ६० ते ६५ दिवस वापर होतो. त्यामुळे वर्षातील इतर ३०० दिवस हा सौर उर्जा संच उर्जानिर्मिती करीत असतानाही उपयोगात येत नाही. दुसरीकडे महावितरणकडे सतत वीजेचा तुटवडा निर्माण होतो.
ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे तथा शेती व्यवसायात सक्र ीय असलेले वाशिम येथील रवि मारशेटवार यांनी सौर उर्जा प्रकल्पातील वीज संकलित करून ती महावितरणला वितरीत करण्याचा प्रकल्प उभारण्याची संकल्पना केली आहे. या अंतर्गत वाशिम तालुक्यातील फाळेगाव थेट आणि खरोळा या दोन गावातील मिळून ९७ शेतकºयांच्या सौरपंपात निर्माण होणारी वीज केबलच्या माध्यमातून महावितरणच्या उपकेंद्राला दिली जाणार आहे. यासाठी एका शेतात एका खोलीचे बांधकाम करून त्यात प्रत्येक शेतकºयाच्या नावे वीज मीटर बसविले जाणार आहे. यावर सर्व संबंधित शेतकºयांची नावेही राहणार आहेत.
सौरपंपात तयार झालेली सौर उर्जा किती याचा अंदाज या मीटरवरून येणार आहे. या खोलीतील सर्व मीटरची जोडणी उपकेंद्राच्या एका केबलवर करून तयार झालेली वीज उपकेंद्राकडे प्रवाहित केली जाईल.


शेतकºयांना महिन्याकाठी सहा हजारांवर उत्पन्न
शेतातील सौरउर्जेच्या पंपाचा वापर झाल्यानंतर जी शिल्लक वीज निर्माण होते. ही महावितरणला वितरीत केल्यानंतर सर्व संबंधित शेतकºयांना महिन्याकाळी किमान सहा हजार ते कमाल दहा हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. अर्थात या प्रकल्पामुळे सौरउर्जेचा वापर योग्यपद्धतीने होईलच शिवाय शेतकºयांना त्यापासून अतिरिक्त लाभही मिळू शकणार आहे. प्रत्येक शेतकºयाच्या शेतात त्याच्या वापरानंतर निर्माण होणाºया अतिरिक्त वीजेचा परिमाणानुसार मोबदला मिळणार आहे.


वीज तुटवड्यावर उपयुक्त पर्याय
राज्यात जलउर्जा आणि औष्णिक उर्जानिर्मितीवर सतत मर्यादा येत आहेत. यामुळे वीजेचा प्रचंड तुटवडा निर्माण होत असून, त्यामुळेच पर्याय म्हणून अपारंपरिक उर्जेचा वापर करण्यावर शासनाकडून भर दिला जात आहे. यासाठी ठिकठिकाणी शेकडो, हजारो कोटी रुपये खर्चून सौरउर्जा प्रकल्पही उभारण्यात येत आहेत. अशात वाशिम तालुक्यातील गीर वंदे गोमातरम शेतकरी गटाच्या प्रकल्पामुळे वीज बचतीला एक नवी दिशा आणि पर्याय मिळणार असून, यामुळे महावितरणच्या तुटवड्यावर नियंत्रण मिळू शकणार आहे.


वाशिम येथील वंदे गोमातरम शेतकरी गटाने सौर कृषीपंपाची वीज व्यर्थ जाऊ नये म्हणून जो प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. त्याचा फायदा शेतकºयांसह महावितरणला आणि पर्यायाने शासनालाही होणार आहे. या प्रकल्प उभारणीसाठी बचत गटाच्या नोंदणीस कृषी विभागाने परवानगीही दिली आहे. आता या प्रकल्पाला मूर्त रुप मिळावे म्हणून महावितरणकडे प्रस्ताव देऊन करार करण्यात येणार आहे. भविष्यातील वीज वापराचा विचार करून महावितरणने कोणतेही आढेवेढे न घेता या उपयुक्त प्रकल्पाच्या कराराला मंजुरी द्यावी.
- रवि मारशेटवार
शेतकरी तथा सदस्य, वंदे गो मातरम शेतकरी गट, वाशिम

Web Title:  Solar power will be use for other purpose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.