सोनलप्रकल्पाच्या मुख्य कालव्याला भगदाड

By admin | Published: December 24, 2014 12:35 AM2014-12-24T00:35:33+5:302014-12-24T00:35:33+5:30

मंगरूळपीर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा प्रभावित.

Sonal Prakalpa's main canal breakdown | सोनलप्रकल्पाच्या मुख्य कालव्याला भगदाड

सोनलप्रकल्पाच्या मुख्य कालव्याला भगदाड

Next

साहेबराव राठोड / शेलूबाजार (मंगरुळपीर, जि. वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यातील पुंजाजीनगर जवळ मुख्य कालव्याला २१ डिसेंबर रोजी भगदाड पडल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासुन पाणी पुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे तर्‍हाळा, मसोला,गणेशपुर या भागातील शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली असुन पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील शेतकर्‍यांना जीवनदान ठरणार्‍या सोनल प्रकल्पात यंदा ७0 टक्के जलसाठा होता. यावर्षी पाणी मिळते की नाही या विचारात अनेक शेतकर्‍यांनी रब्बी पिके घेण्याकडे पाठ फिरवली आहे. ५ डिसेंबर रोजी पाणी सुटल्यानंतर १८ डिसेंबर रोजी तर्‍हाळा गावानजीक पाणी पोहचले व मसोला गावापर्यंंत पाणी पोहचत नाही तोच मुख्य कालव्याला भगदाड पडुन हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला कालवा फुटल्याने प्रकल्पातुन पाण्याचा प्रवाह एक सेंटी मिटर करण्यात आला आहे. दोन दिवस उलटल्यानंतरही कालव्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. मसोला सह तर्‍हाळा गावातील अनेक शेतकर्‍यांनी रब्बी पिकाची पेरणी केली परंतु अद्याप पर्यंंंत त्यांच्या शेतापर्यंंत पाणी पोहचले नाही. त्यामुळे रब्बी हंगामही खरीप प्रमाणे जाते की काय असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. सोनल प्रकल्पाचे प्रभारी शाखा अभियंता एस. पी.पिदडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुख्य कालव्याला पुंजाजीनगर जवळ भगदाड पडले असल्याचे सांगूण दुरूस्तीकाम सुरू असल्याचे सांगीतले.

Web Title: Sonal Prakalpa's main canal breakdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.