लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १९८५ पासून साहित्य क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या, विविध पुस्तकांचे वाचन करून कथा, कविता, कादबंरी लेखन करणाºया, परिवर्तनवादी विचारांवर व्याख्यान देणाºया, समाजातील जुन्या चालीरिती, वाईट परंपरा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणाºया मानोरा येथील प्रतिथयश महिला साहित्यीक विमलताई वाघमारे यांच्या साहित्य निर्मिती व सामाजिक कार्यासंबंधी साधलेला हा संवाद....
आपणास साहित्याची आवड कधीपासून आहे?शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिक्षिका म्हणून कार्य केले आणि मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाली. खरेतर वाचनाची पुर्वीपासूनच आवड होती; मात्र शिक्षकीपेशात कार्य करताना त्याबद्दल अधिकच रुची निर्माण झाली. याचदरम्यान कविता रचण्याचा छंद लागला. त्यानंतर एखादे पुस्तक प्रकाशित व्हावे, अशी मनोमन इच्छा होती. ती ‘प्रकाशाची वाट’ या प्रकाशित काव्यसंग्रहाने पूर्ण झाली.
साहित्य क्षेत्रात आणखी कोणते पुस्तक प्रकाशित झाले ?‘लेखनीची धार’ हा काव्यसंग्रह, उत्तर मिळेल काय? ही कादबंरी आणि ‘फकीरा एक समिक्षा’ आदी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘तो निळा सागर’ ही कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
आपल्या लेखनाचा आशय कोणता?माझ्या साहित्यात समाजाचे वास्तव, आंबेडकरी विचारधारा, सामाजिक समस्या, शेतकरी कष्टकरी यांचे दु:ख आणि स्त्रीविषयक समस्यांविषयीचे चिंतन आहे. समाजातील उच्चशिक्षीत महिला देखील अंधश्रद्धा, देवभोळेपणा यात गुरफटल्या जात आहेत. स्त्रीयाच कशा स्त्रियांच्या मारेकरी आहेत, जुन्या वाईट प्रथा, परंपरा यांना चिकटून अधोगती करण्यात मग्न असणाºया स्त्रीया पुरोगामी विचारसरणीपासून कोसोदूर आहेत. तथाकथीत धर्ममार्तडांनी दिलेली शिकवणूक अंगीकारून धर्म व देवाच्या नावावर स्तोम माजविले जात आहे. त्यास माझा ठामपणे विरोध आहे.
साहित्य क्षेत्रात कोणते पुरस्कार मिळाले?महाराष्टÑ दलीत साहित्य अकादमी, भुसावळचा काव्यसाधना पुरस्कार, अ.भा. दलित अकादमी, नवी दिल्लीचा डॉ.आंबेडकर सन्मान, सावित्रीबाई फुले महिला भुषण सन्मान, काव्याज्योती पुरस्कार, रमाई सेवा पुरस्कार, साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट साहित्यीक पुरस्कार, अस्मितादर्श वाड्:मय पुरस्कार, बहुजन जीवनगौरव पुरस्कार, केशर वाड्:मय आदी पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झाले आहेत; तर विविध ठिकाणी भावपूर्ण सत्कारही झाला आहे.