लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीची मालिकाच सुरू आहे. आधीच आॅगस्ट महिन्यातील पावसामुळे सोयाबीनचे पीक संकटात असताना आता गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वºहाडात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे या पिकाच्या शेंगा आता गळून पडत असल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पश्चिम वºहाडातील बुलडाणा, वाशिम आणि अकोला या तिन्ही जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच आहे. याच पिकावर शेतकºयांचे अर्थचक्र सर्वाधिक अवलंबून असते. यंदा या तीन जिल्ह्यांत मिळून ८ लाख ८५ हजार २४५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यात यंदाच्या खरीप हंगामात या पिकावर संकटांची मालिकाच सुरू आहे. त्याचा प्रत्यय पेरणीपासूनच येत आहे. राज्यात यंदा निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका शेतकºयांना बसला. त्यामुळे दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसाचा खंड, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण आणि त्यामुळे वाढलेला किडींचा प्रादूर्भाव आदि आपत्तींनी शेतकरी पुरता बेजार झाला. त्यात आॅगस्ट महिन्यात सतत १५ दिवस पावसाने झड लावली होती. त्यामुळे पाणी शेतात साचून राहिल्याने सोयाबीन पिकावर बुरशी रोगाचा प्रादूर्भाव होऊन ते पिवळे पडले. आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पश्चिम वºहाडात पावसाने जणू ठाण मांडले आहे. काही भागांत जोरदार पाऊस पडत असल्याने सोयाबीनच्या शेंगा गळून पडत आहेत. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनात मोठी घट येणार असून, त्यावर कोणता उपायच नसल्याने ही घट टाळणे अशक्यच असून, सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे दिसत आहे. निम्म्याहून अधिक क्षेत्र सोयाबीनचीच पेरणीपश्चिम वºहाडात यंदा १५ लाख ६७ हजार २७८ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी ८ लाख ८५ हजार २४५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचीच पेरणी आहे. अर्थात पश्चिम वºहाडातील एकूण खरीप क्षेत्रापैकी ५६ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात केवळ सोयाबीन पीक आहे. अर्थात या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर अवलंबून आहेत. हेच पीक नैसर्गिक आपत्तींनी संकटात सापडल्याने शेतकºयांचे अर्थचक्र विस्कळीत होणार आहे.
अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंंगाची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 7:40 PM