जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा लाड असे चार आगार कार्यान्वित आहेत. प्रत्येक आगारातून साधारणत: पाच एसटी ट्रक मालवाहतुकीसाठी सोडल्या जात आहेत. त्यानुसार, २० ते २२ मालवाहतूक करणाऱ्या एसटी ट्रकच्या माध्यमातून चारही आगारांनी कोरोनाकाळात ४० लाखांपेक्षा अधिक कमाई केली; मात्र त्यावर कार्यरत चालकांना मुक्काम पडल्यास ना व्यवस्थित जेवण मिळते, ना आंघोळीला, प्यायला पाणी मिळते. यामुळे चालक पुरते हैराण झाले आहेत.
.......................
(बॉक्स)
परतीचा माल मिळेपर्यंत तिथेच मुक्काम
कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह विविध मालांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमधून मागणीनुसार मालाची उचल केली जाते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात माल पोहोचविल्यानंतर तेथूनही माल घेतल्याशिवाय चालकांना परतता येत नाही. त्यामुळे कुठलीही सुविधा नसताना एसटीतच दोन ते तीन दिवस मुक्काम ठोकावा लागतो. हीच मोठी समस्या सध्या चालकांना भेडसावत आहे.
..............
(बॉक्स)
ॲडव्हान्स मिळतो; पण पगारातून होतो कट
मालवाहतूक करणाऱ्या एसटी ट्रकवर कार्यरत चालकांना त्यांच्या आगारांकडून खर्चापोटी ॲडव्हान्स दिला जातो; मात्र तो त्यांच्या वेतनातून कापून घेतला जात असल्याने मालवाहतुकीने एसटी मालामाल होत असली तरी चालक मात्र कंगाल होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात माल घेऊन गेल्यानंतर तेथूनही एसटी ट्रकमध्ये माल लोड केल्याशिवाय परतता येत नाही. तीन दिवसांच्या मुक्कामानंतरही माल न मिळाल्यास चालकांना गाडी तिथेच सोडून कुठल्याही खासगी वाहनाने मुख्यालयी परतावे लागते. यात त्यांचे बरेच पैसे खर्च होतात.
..............................
(बॉक्स)
कोरोनाकाळात चाळीस लाखांपेक्षा अधिक कमाई
कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून एसटीची प्रवाशी वाहतूक बंद असली तरी मालवाहतूक मात्र सुरू आहे. मालवाहतुकीच्या माध्यमातून वाशिम आगाराला कोरोनाकाळात दहा लाखांपेक्षा अधिक कमाई झालेली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये माल मिळावा, यासाठी खुद्द चालकांनाच भटकंती करावी लागते. यात त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
.....................
चालक म्हणतात..
एसटी महामंडळात नियुक्ती मिळाली, तेव्हापासून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या एसटीवरच सेवा दिली; मात्र गेल्या काही महिन्यांपासून मालवाहतुकीच्या वाहनावर सेवा द्यावी लागत आहे. यामुळे अनेक दिवस घरापासून दूर राहण्याची वेळ ओढवली आहे.
- आर.पी. भालेराव, चालक
...............
अडचणीच्या काळात एसटी महामंडळाने सोपविलेली जबाबदारी चालकांना पार पाडावीच लागणार, या भूमिकेतून चालकांनी मालवाहतूक करणाऱ्या एसटी ट्रकवर कुठलीही तक्रार न ठेवता सेवा देणे सुरू केले आहे; मात्र विविध समस्यांमुळे चालक पुरते हैराण झाले आहेत.
- आर.जी. मानकर, चालक
...........................
कोट :
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात माल घेऊन गेल्यानंतर तेथूनही माल घेऊनच परत येण्याचा नियम आहे; मात्र अनेकवेळा दोन ते तीन दिवस मुक्काम करूनही माल मिळत नाही. अशावेळी चालकांना जवळचे पैसे खर्चून परतावे लागते. यात त्यांचेच नुकसान होत आहे.
- मनीष बत्तुलवार
सचिव, राष्ट्रीय एसटी कामगार काॅंग्रेस
............................
२२
वाहतूक सुरू असलेले ट्रक
२२
जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक