मानोरा - तालुक्यातील हळदा येथे वारकरी सांप्रदायिक संस्कार शिबिरास प्रारंभ झाला असून, सदर शिबिर १ मे २०१८ पर्यंत चालणार आहे.
हभप संजय महाराज यांचे प्रेरणेतुन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश नेमाडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत राठोड , गावकºयांच्या पुढाकारातून सदर शिबिर सुरू असून, यामध्ये जवळपास ६० प्रशिक्षणार्थी आहेत. दररोज सकाळी ६ ते ८.३० पर्यंत पाठ घेतला जातो. त्यानंतर सकाळी ९ ते १२ पर्यंत दुसरा पाठ व दुपारी ३ ते ५ पर्यंत शिकवणी व संध्याकाळी ६ ते ८ पर्यंत हरिपाठ घेतल्या जातो. शेवटी पसायदानाने सांगता केल्या जाते. या शिबीराकरिता हभप संजय महाराज अलोने आळंदीकर यांच्या या प्रेरणेने स्फुर्ती मिळाली असून त्यांनीच प्रशिक्षक म्हणून हभप जगन्नाथ महाराज उबाळे आळंदीकर, हभप साईराम महाराज वाबळे आळंदीकर व इतरही प्रशिक्षकांना पाठविले आहे. गावातील पोलिस पाटील निलेश नेमाणे, दिनकर नेमाणे, दिपक नेमाणे, प्रशांत रोडेकर, गुलाबराव भेंडे, गजानन नेमाने इतरही गावकरी मंडळी शिबीर यशस्वीतेकरिता दररोज या ठिकाणी उपस्थित राहून नियोजन व परिश्रम घेत आहेत.