साठवण तलावाचे काम रखडले

By admin | Published: December 24, 2014 12:33 AM2014-12-24T00:33:37+5:302014-12-24T00:33:37+5:30

शेतकरी नाराज: लोहगाव महागाव येथील साठवण तलावासाठी जमीन अधिग्रहणाची प्रकिया अपूर्ण.

Storage work stopped | साठवण तलावाचे काम रखडले

साठवण तलावाचे काम रखडले

Next

गोपाल वडते / लोहगाव महागाव (कारंजा, जि. वाशिम)
कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे चार वर्षांंंपूर्वी साठवण तलावाचे भूमीपुजन होऊन कामास सुरुवातही झाली; परंतु गत दोन वर्षांंंपासून विविध अडचणींमुळे चार वर्ष होत आले तरी, हा तलाव अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण आहे.
ग्रामीण परिसरात पाण्याची टंचाई भासू नये, सिंचना क्षेत्रात वाढ व्हावी या उद्देशाने शासन कोट्यवधी रुपये खचरून ठिकठिकाणी बांध आणि साठवण तलावाची निर्मिती करीत असले तरी, या योजनांची प्रभावी अंमल बजावणी होत नसल्यामुळे शासनाचेच कोट्यवधी रुपयांचे नुकसानच होत असल्याचे दिसत आहे. लोहगाव महागाव येथे साधारण पाच वर्षांंंपूर्वी लघू सिंचन जलसंधारण विभागामार्फत साठवण तलावाला मंजुरी मिळाली होती. या तलावामुळे लोहगाव महागाव परिसरातील जवळपास १३८ हेक्टर शेती सिंचन होण्याची अपेक्षा असल्यामुळे शेतकरी वर्गांंंत आनंदाचे वातावरण होते. या तलावासाठी त्यावेळी आवश्यक जमिनही शेतकर्‍यांकडून अधिग्रहीत करण्यात आली. चे भूमीपुजन तत्कालीन आमदार प्रकाश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि भूमीपुजनानंतर साधारण पाच ते सहा महिन्यांतच या तलावाचे काम सुरू झाले. हे काम सुरळीतपणे चालु राहिल्यास मजुरांना रोजगार मिळेल आणि शेती सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा लोहगाव महागाव परिसरातील शेतकरी आणि मजूर वर्गाकडून व्यक्त करण्यात येत होती; परंतु अपेक्षित असलेल्या तलावाचे काम गत दीड वर्षांंंपासून बंद पडले आहे. लोहगाव महागाव साठवण तलावाचे काम सुरू करून ते त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
लोहगाव महागावच्या तलावासाठी आवश्यक जमिन अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आतापर्यंत ३६ हेक्टर जमिन अधिग्रहित करण्यात आली असून, उर्वरित जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असल्याचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर. ए. सपकाळ यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.

Web Title: Storage work stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.