वाशीम: प्रदूषणाचा भस्मासुर पृथ्वीला गिळु पाहत आहे .प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्ररूप धारण केलेले असुन पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक बनले आहे. यासंबंधी समाजात जागृती करण्यासाठी ५ जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कुलच्यावतीने संस्थाध्यक्ष प्रा . हरीभाऊ क्षिरसागर ,प्राचार्य मीना ऊबगडे व राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन ईकोक्लबच्या विद्यार्थींच्या माध्यमातुन नक्षत्र व राशी उद्यानाची निर्मीती करण्यात आली असुन ,नक्षत्र आणी राशी नुसार वृक्षांची लागवड करण्यात आली.
ईकोक्लबच्या विद्यार्थींनींच्या माध्यमातून प्रामुख्याने जांभुळ, उंबर, आवळा ,कुसला, मोह, कडुलिंब, आंबा, कदंब, शमी, रुई, फणस, नागचाफा, सांबर अशा विविध झाडांची लागवड करून जैवविविधता प्रकल्प उभारण्यात आला आहे . वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मीना ऊबगडे तर प्रमुख पाहुण्या म्हणुन प्रणीता हरसुले होत्या .वृक्षारोपण कार्यक्रमाला अस्मिता वानखडे ,बिना बोने, अनघा जोशी, सुनिता बोरकर, संगीता गाडे, किरण देशमुख , अनुराधा दायमा, सुनीता टांक, जयश्री कान्हेड, संजय दळवी, युवराज कुसळकर यांची प्रमुख उपस्थीती लाभली होती. नक्षत्र व राशी उद्यान निमीर्तीला ईकोक्लबचे विद्यार्थी सचिन कांबळे, अमीत बोरकर, आदित्य वाकुडकर, साईकिरण राऊत, प्रफुल्ल भादलकर, अनिकेत देशमुख , मुस्कान जैसवाल, उत्कर्षी भंडारे , वैभवी नरवाडे , भाग्यश्री घुले, ताशु शर्मा , प्रगती वाघ ,सानिका इंगळे व संस्थेतील कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले . शाळेच्या हरीतसेनेच्या ऊपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.