विद्यार्थ्यांनी जाळल्या गुटखा, तंबाखूच्या पुड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:10+5:302021-02-06T05:17:10+5:30

तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेटचे व्यसन शरीरासह समाज आणि राष्ट्रासाठी अत्यंत हानीकारक आहे. दरम्यान, धूम्रपानाचे व्यसन म्हणजे, मृत्यूला आमंत्रण, तंबाखू ...

Students burn gutkha, tobacco powder | विद्यार्थ्यांनी जाळल्या गुटखा, तंबाखूच्या पुड्या

विद्यार्थ्यांनी जाळल्या गुटखा, तंबाखूच्या पुड्या

Next

तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेटचे व्यसन शरीरासह समाज आणि राष्ट्रासाठी अत्यंत हानीकारक आहे. दरम्यान, धूम्रपानाचे व्यसन म्हणजे, मृत्यूला आमंत्रण, तंबाखू मतलब खल्लास, तंबाखू न खायेंगे न खाने देंगे, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला व गुटखा, तंबाखू पुड्यांची होळी केली.

लायन्स क्लबच्या वतीने आयोजित पोस्टर स्पर्धेत रोशन बाजडने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय विश्वजा देशमुख, तर तृतीय क्रमांक कीर्ती बकाल या विद्यार्थिनीने प्राप्त केला. त्यांना ज्योती चरखा, सविता अग्रवाल, सारिका बाकलीवाल, भोंडे व एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या उपक्रमांत अंजली घुगे, श्रुती लहाने, पल्लवी वानखेडे, तृप्ती बोरकर, वैष्णवी मर्धने, शिवानी देशमाने, भावना जाधव, सुष्मा राऊत, साक्षी देवळे, खुशी तोळंबे, आकाक्षा पवार, खुशी कुटे, श्रेया झुंजारे, शीतल वाळके, सोहम निकम, यशोमित्र दापूरकर, ओम राऊत, निखिल चाकर, ओम गाभणे, अमन लहाने, स्वप्निल साळसुंदर, हरिओम भोयर, विशाल आलमवार, ओम गायकवाड, वंश मुंदरे, देवा दाभाडे, प्रणव कोल्हे, प्रणय राठोड आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल आदी उपस्थित होते.

Web Title: Students burn gutkha, tobacco powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.